(OFB Recruitment) अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 23 पदांची भरती

Ordnance Factory Board, Department of Defence Production of Ministry of Defence, Government of India. Ordnance Factory Ambarnath Recruitment 2019 (Ambarnath Ordnance Factory Bharti 2019) for 23 Graduate Apprentice and Diploma Apprentice.

0
ofb recruitment
MahaNews

OFB Recruitment 2019 (MahaNews) – ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड म्हणजेच आयुध निर्माण बोर्ड हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. आयुध निर्माण बोर्ड तर्फे अधिकृत रित्या एकूण 23 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, इलेक्ट्रॉनिक & टेलिकम्युनिकेशन आणि मेटलर्जी विषयात पदवी आणि पदविका प्राप्त असलेले विद्यार्थी 20 ऑक्टोबर 2019 आधी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. आयुध निर्माण बोर्डाच्या च्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

OFB Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: प्रशिक्षणार्थी भरती 2019.

एकूण रिक्त जागा: 23 जागा.

पदाचे नाव: (A) पदवीधर अप्रेन्टिस – 08 (इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, मेटलर्जी) आणि (B) डिप्लोमा अप्रेन्टिस – 15 (केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, मेटलर्जी).

शैक्षणिक पात्रता आणि अटी: (A) पदवीधर अप्रेन्टिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी. (B) डिप्लोमा अप्रेन्टिस – संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा.

वयाची अट: उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक.

नोकरी ठिकाण: अंबरनाथ (ठाणे जिल्हा).

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 ऑक्टोबर 2019.

अधिकृत संकेतस्थळ: https://ofb.gov.in/

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Sr. General Manager, Ordnance Factory, Ambarnath, District- Thane, Maharashtra, PIN- 421502

ofb recruitment 2019
MahaNews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Ordnance Factory Board च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here