पोलीस खात्यातील पद खांद्यावरील संकेत चिन्हानी ओळखता येतात

Police Department Ranks Information in Marathi

0
पोलीस खात्यातील पद
MahaNews Marathi Lekh

पोलीस खात्यातील पद: आपल्या महाराष्ट्र आणि भारतीय पोलिसांमध्ये वेगळ्या रँकचे जवान व अधिकारी आहेत. पण बहुतेक लोकंना त्यांच्या सर्व गोष्टींबद्दल माहिती नसते म्हणजे की त्यांचे पद व रँक कोणती आहे ते. होय हे इतके अवघड असे काम नाही आणि आपण त्यांचे बॅच पहुन देखील त्या गोष्टींचा फरक करू शकतो.

सामान्य लोकांच्या बरोबर ही माहिती ज्यां विद्यार्थ्यांना देखील इंडियन पोलिस मध्ये भरती व्हायचे आहे त्यांना देखिल ही माहिती उपयोगी आहे. पोलीस खात्यातील जवान व अधिकाऱ्यांच्या युनीफॉर्म वर त्यांच्या हुद्द्यानुसार बँचेस प्रदान केली जातात.

पण त्यांचा अर्थ माहित नसल्याने बहुतेक वेळा आपल्याला ठराविक पोलीस कोणत्या पदावर आहे हे समजत नाही.  त्यांच्यासाठी या रँक (पदे) आणि बॅजच्या दरम्यानच्या फरक समजने आवश्यक आहे. आम्ही या बातमीमध्ये आपला रँक (पदे) आणि बॅचविषयी माहिती देत आहोत.

पोलीस खात्यातील पद (प्रमुख दोन श्रेणी):

1.गॅझेटेड ऑफिसर्स:

या श्रेणीमध्ये ऑल इंडियन पोलीस सर्विस (IPS) अधिकाऱ्यांचा समावेश होतो. जो क्लास-1 अधिकारी म्हणून ओळखतात. तसेच या श्रेणीमध्ये राज्य पोलीस सर्विस इन्स्पेक्टर या पदापेक्षा वरच्या पदावरील अधिकारी असेल तर त्यांचा देखील समावेश होतो. ते क्लास-2 गॅझेटेड ऑफिसर्स म्हणून ओळखले जातात.

2. नॉन-गॅझेटेड ऑफिसर्स:

या श्रेणीमध्ये उर्वरित सर्व पोलीस खात्यामधिल सर्व अधिकार्यांचा समावेश होतो. हे क्लास-3 आणि क्लास-4 पोस्ट मध्ये मोडतात.

राज्य पोलीस:

पोलीस खात्यातील पद
MahaNews Marathi Lekh

पोलीस कॉन्स्टेबल (PC):

पोलीस कॉन्स्टेबल या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर कोणत्याही प्रकाराचे संकेत चिन्ह नसतात. त्यांच्या अंगावर फक्त खाकी वर्दी असते. आणि त्या शोल्डर वरती मपो (महाराष्ट्र पोलीस) असा दोन्ही शोल्डर वरती बँचेस असतो.

सिनियर पोलीस कॉन्स्टेबल/पोलीस नाईक (SPC/PN):

महाराष्ट्रात सिनियर पोलीस कॉन्स्टेबल/पोलीस नाईक पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या   खांद्यावर नेव्ही ब्ल्यू रंगाच्या पट्टी असते, ज्यावर दोन सोनेरी रंगाच्या पट्ट्या असतात. आणि त्या शोल्डर वरती मपो (महाराष्ट्र पोलीस) असा दोन्ही शोल्डर वरती बँचेस असतो.

हेड कॉन्स्टेबल (HC):

महाराष्ट्रात हेड कॉन्स्टेबल  पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या   खांद्यावर नेव्ही ब्ल्यू रंगाच्या पट्टी असते, ज्यावर तीन सोनेरी रंगाच्या पट्ट्या असतात. आणि महाराष्ट्र पोलिसांच्या शोल्डर वरती मपो (महाराष्ट्र पोलीस) असा दोन्ही शोल्डर वरती बँचेस असतो.

असिस्टंट सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (ASI):

असिस्टंट सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये एक स्टार आणि त्या खाली लाल आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. आणि त्या पट्टयांच्याखाली शोल्डर वरती मपो (महाराष्ट्र पोलीस) असा दोन्ही शोल्डर वरती बँचेस असतो.

सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (PSI):

सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये दोन स्टार आणि त्या खाली लाल आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. आणि त्या पट्टयांच्याखाली शोल्डर वरती मपो (महाराष्ट्र पोलीस) असा दोन्ही शोल्डर वरती बँचेस असतो.

असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (API):

असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये तीन स्टार आणि त्या खाली लाल रंगाची पट्टी असते. आणि त्या पट्टीच्याखाली शोल्डर वरती मपोसे असे दोन्ही शोल्डर वरती बँचेस असतो.

इन्स्पेक्टर ऑफ पोलीस (PI):

इन्स्पेक्टर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये तीन स्टार आणि त्या खाली लाल आणि निळ्या रंगाच्या पट्ट्या असतात. आणि त्या पट्टीच्याखाली शोल्डर वरती मपोसे असे दोन्ही शोल्डर वरती बँचेस असतो.

असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस (ACP)/डेप्युटी सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस(SDPO) :

असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये तीन स्टार आणि त्या खाली शोल्डर वरती मपोसे असे दोन्ही शोल्डर वरती बँचेस असतो.

गॅझेटेड ऑफिसर्स:

इंडियन पोलीस सर्विस (IPS) हे ऑफिसर्स  यूपिएससी (UPSC) एग्जाम सिलेक्ट होऊन इंडियन पोलीस सर्विस (IPS) मध्ये डायरेक्ट येतात.

असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ACP किंवा DSP):

असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये तीन स्टार आणि दोन्ही शोल्डर वरती IPS चा बॅच असतो.

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा ऍडिशनल सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (ADL DCP किंवा ASP):

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये अशोकस्तंभ आणि दोन्ही शोल्डर वरती IPS चा बॅच असतो. त्याची सर्विस 10 वर्षा पेक्षा कमी असते, आणि राज्य पोलीस सर्विस मध्ये पण असते दोन्ही शोल्डर वरती मपोसे असा बॅच असतो.

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (DCP किंवा SP):

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये सर्वात वर अशोकस्तंभ, त्या खाली एक स्टार आणि सगळ्यात शेवटी दोन्ही शोल्डर वरती IPS चा बॅच असतो.

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (सिलेक्शन ग्रेड) किंवा सिनियर सुप्रीटेंडन्ट ऑफ पोलीस (DCP किंवा SSP):

डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस (सिलेक्शन ग्रेड) पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये सर्वात वर अशोकस्तंभ, त्या खालोखाल दोन स्टार आणि सगळ्यात शेवटी दोन्ही शोल्डर वरती IPS चा बॅच असतो.

डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस (DIGP):

डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये सर्वात वर अशोकस्तंभ, त्या नंतर तीन स्टार आणि सगळ्यात शेवटी दोन्ही शोल्डर वरती IPS चा बॅच असतो.

इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस  (IGP):

इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये सर्वात वर एक स्टार, त्या नंतर क्रॉस असलेली तलवार आणि सगळ्यात शेवटी दोन्ही शोल्डर वरती IPS चा बॅच असतो.

कमिशनर ऑफ पोलीस किंवा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (CP किंवा DGP, राज्य सरकार):

कमिशनर ऑफ पोलीस पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावरील संकेत चिन्हा मध्ये सर्वात वर अशोकस्तंभ, त्या नंतर क्रॉस असलेली तलवार आणि सगळ्यात शेवटी दोन्ही शोल्डर वरती IPS चा बॅच असतो.

अश्याच चांगल्या माहितीसाठी आणि मराठी लेखांसाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here