शंकरच्या प्रामाणिकपणाला 21 तोफांची सलामी.

0
Satara Shankar Honesty
Satara Shankar Honesty
Shankar Honesty Satara शंकरच्या प्रामाणिकपणाला 21 तोफांची सलामी. हा शंकर समाजाचा बहुमान आहे.
शेष नागाला ही धरती बोजड वाटत नाही कारण शंकर शिंदे सारखी प्रामाणिक लोकं आजही या पृथ्वीवर वास्तव्यास आहेत.
बुधवार दिनांक 11/22/2019 दत्त जयंती,गोडोलीतील साई मंदिर परिसर त्यामुळे दर्शनार्थीं ची प्रचंड गर्दी  आणि  दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार त्यामुळे पूजेचे साहित्य घेणाऱ्यांची ही गर्दी .
या परिसरात नेहमीच ट्रॅफिक जाम असतेच पण काल या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. अशातच शंकर शिंदे दिवसभराचे काम उरकूरून घरी निघाला होता . शंकर गोडोलीतील रोहित कणसे यांच्या  कणसे ट्रेडर्स या सिमेंटच्या दुकानात कामगार आहे.दिवस भर इमाने इतबारे काम करणाऱ्या शंकराच्या पायाखाली साई मंदिरा जवळ आल्यावर  काहीतरी वेगळे जाणवले . नक्कीच दगड नाही म्हणून उचलले तर ते लेदर चे पैश्याचे पाकीट होते.
पाकिटात बऱयापैकी रोख रक्कम , विविध बँकांचे ATM कार्ड, ड्रायव्हींग लायसन, आधारकार्ड, पॅनकार्ड, आणि विशेष म्हणजे सर्व ATM कार्ड वर Pin Cod लिहले होते.
रात्री उशिरापर्यंत शंकर प्रयत्न करत होता. पण बरेच कागदपत्रे इंग्रजीत असल्यामुळे त्याचा त्या मालकाशी संपर्क होत नव्हता. त्यातच मोबाईल मधील बॅलन्स संपला त्यामुळे उद्या सकाळ होण्याची वाट पहावी लागली.
शंकर आज सकाळी सकाळी लवकर कामावर आला आणि मालकांना (रोहित कणसे) हकीगत सांगितली रोहित कणसे यांनी अत्यंत हुशारीने आणि शितापीने पत्ता आणि मोबाईल नंबर काढून पाकिटाचा मालक शोधला.
तुम्ही प्रशांत म्हमाणे बोलयाला का? तुमचे पैश्याचे पाकीट मला सापडले आहे. हा संवाद ऐकला आणि प्रशांत म्हमाने यांनी देवाला हात जोडून देवाचे आभार मानले.
सकाळी ओळख परेड झाली. प्रशांत म्हमाणें कडे पाकीट सुपूर्त केले, प्रशांत पण दिलदार माणूस पाकिटात होती ती  सर्व रक्कम शंकरच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला . पण शंकर खरोखरच नावा प्रमाणेच  भोळा आणि प्रामाणिक.  नको साहेब साहेब म्हणून शंकर लांब गेला. फार आग्रह केल्यानंतर शंकर म्हणाला “40 रुपये द्या साहेब रात्री फोनाफोनी करून  बॅलन्स संपला म्हणून सकाळी टाकावा लागला.”शंकरच्या या वाक्या बरोबरच उपस्थित सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्याच्या मी पहिल्या आहेत.
खरचं शंकर शिंदे सारखी प्रामाणिक आणि निर्लोभी लोकं पूर्वी सतयुगात रहात असत असे मी अनेक वेळा वाचले आणि ऐकले आहे. शेष नागाच्या फण्यावर तरलेली ही धरती शेष नागाला जड वाटत नाही ते अशा अनेक शंकर शिंदे वसारख्या प्रामाणिक लोकांच्या वास्तवा मुळेच हे मात्र आज पक्के पटले.
श्रीमद गीतेमध्ये स्थितप्रज्ञ लोकांची लक्षणे सांगताना निर्मम / निर्मोही हा महत्वाचा गुण मी अनेक वर्षे वाचत आलो आहे. पण या शब्दाची अनुभूती मात्र शंकर शिंदे च्या रूपाणे आज मिळाली. आपल्या महिन्याच्या पगारा एवढी रक्कम असलेले/सापडलेले पाकीट माघारी देण्याची भावना निर्माण होणे. ही बाब अत्यंत दुर्मिळ आणि महान आहे. अनेक महान व्यक्तिमत्त्वाबद्दल मी आवर्जून लिहितो पण आज शंकर शिंदे बद्दल लिहले नसते तर माझ्या प्रतिभा देवतेने मला कधीही माफ केले नसते.
आज ह्या प्रामाणिक माणसाला 11 तोफांची सलामी बसतेच बसते.
शंकर या वर्तमान काळात तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस भेटणे म्हणजे वाळवंटात ओयाशीस भेटल्या सारखे आहे. एका बाजूला जळता जळणार नाही इतकी संपत्ती असूनही चोऱ्या-माऱ्या करणारे महाभाग आणि एका बाजूला अत्यंत तोकडी कमाई असूनही प्रामाणिक असलेली तुझ्या सारखी उमदी मुलं पहिली की भरून येते.
शंकर तुला तहे दिलसे सलाम।
– संतोष कणसे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here