फोन वापरून Voter ID List 2019 मध्ये आपले नाव कसे बघाल?

Steps to check voter id list 2019 Maharashtra, Maharashtra Election 2019.

0
voter id list 2019 maharashtra
MahaNews

Voter ID List 2019 Maharashtra – (MahaNews)

वोटर लिस्ट म्हणजेच मतदान यादीत स्वतः चे किंवा मतदाराचे नाव कसे चेक करायचे तेही मोबाईल चा वापर करून या विषयावर सविस्तर माहिती सांगणार आहे. भारत हा लोकशाही वर चालणारा देश आहे. मतदान करून सरकार निवडली जातात.

कोणत्याही लोकशाही देशात मतदान करणे हे आपले कार्य आहे. कारण मतदान करून आपण राज्याचे मंत्री आणि देशाचे पंतप्रधान निवडून देतो. वेळोवेळी निवडणूक करण्याची जिम्मेदारी इलेक्शन कमिशन ची असते.

voter ID list 2019 steps to check in marathi
MahaNews

तुम्हाला सांगायचे कारण की नवीन नावे लिस्ट मध्ये जोडतात, आणि मृत्यू झालेल्यांची नावे काढून टाकतात त्यामुळे वोटिंग लिस्ट मध्ये बदल हा होतच असतो त्यामुळे मतदान यादी मध्ये आपले नाव आहे का नाही ते चेक करने आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही आपल्याला वोटिंग लिस्ट मध्ये नाव आहे का नाही ते चेक करण्याचे याबद्दल सांगणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने काही सेकंदांमध्ये आपण ते पाहू शकतो तेही अगदी मोफत.

वोटिंग करण्यासाठी पण काही नियम आहेत; जसे की:

A. मतदाराचे वय 18 वर्षे किंवा त्या पेक्षा अधिक पाहिजे.
B. तुमच्या जवळ वोटर आयडी कार्ड पाहिजे.
C. मतदान यादी मध्ये नाव देखिल असणे गरजेचे आहे.

Voter ID List 2019 मध्ये आपले नाव कसे बघायचे ते पाहुया:

A. सर्वात पहिल्यांदा गुगल क्रोम अथवा इतर ब्राऊझर मध्ये जाऊन नँशनल वोटर सर्विस पोर्टलवर जा. Voter List 2019 किंवा Electoral असे सर्च करा.

B. https://electoralsearch.in ह्या सरकारच्या अधिकृत संकेथळावर क्लिक करा.

C. आपण दोन पद्धतीने चेक करू शकतो. (i) विवरण द्वारा खोज/Search by Details. (ii) वोटर आयडी वरून/Search by EPIC No.

voter ID list 2019 steps to check in marathi
MahaNews

वोटर आयडी वरून/Search by EPIC No. वरून कसे चेक करायचे ते पाहुया:

जर तुमच्या जवळ वोटर आईडी कार्ड असेल तर नाव चेक करण्यासाठी खाली दिलेली स्टेप फाॅलो करा.

A. सर्च वोटर आयडी वरून/Search by EPIC No. नंबर वर क्लिक करा.
B. येथे स्वतःचा वोटर आईडी कार्डनंबर/ EPIC नंबर टाका.
C. त्याच्या  खाली  मेन्यू मध्ये  आपले राज्यं  निवडा, जर आपले राज्य महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा ब्राउझर वरती दिसत असलेला कोड / कैप्चा कोड टाका.
D. त्यानंतर सर्च वर क्लिक करा.

जर आपले नाव मतदार सूचीमध्ये असेल, तर सर्च बटणच्या खाली दिसेल.  आणि काहीही दिसत नसल्यास आपले नाव मतदार सूचीमधून नाहीशे किंवा गायब झाले आहे.

voter ID list 2019 steps to check in marathi
MahaNews

विवरण द्वारा खोज/Search by Details वरून कसे चेक करायचे ते पाहुया:

आपल्याकडे मतदार ओळखपत्र नसल्यास, आपल्याला खालील चरणांचे/स्टेपचे अनुसरण करावे लागेल, दुसऱ्या प्रकारात  आपल्याला स्वत:ची माहीत टाकावी लागेल, जसे की नाव, वडील किंवा पतीचे नाव, जन्म तारीख, लिंग हे सर्व पृष्ठावर दिलेल्या रिक्त बॉक्समध्ये लिहावे. मग हे कसे करावे तर ह्या स्टेप आहेत:

A. सर्च विवरण द्वारा खोज/Search by Details वर क्लिक करा.
B. आपले पूर्ण नाव येथे प्रविष्ट करा.
C. आपल्या वडिलांचे / पतीचे नाव टाइप करा.
D. आपले लिंग निवडा.
E. कृपया आपले वय किंवा जन्मतारीख माहिती द्या.
F. मग आपले राज्य निवडा.
G. खाली आपला जिल्हा निवडा.
H. त्यानंतर आपण आपला विधानसभा मतदारसंघ निवडा.
I. यानंतर खाली असलेल्या बॉक्समध्ये दिलेला 5 अंकांचा/कैप्चा कोड योग्यरित्या लिहा.
J. ही सर्व माहिती दिल्यानंतर शोध बटणावर क्लिक करा.

voter ID list 2019 steps to check in marathi
MahaNews

K. यानंतर, सर्व पाहिल्यानंतर आपल्या नावावर क्लिक करा.
L. एकूण  सर्व निकालापासून आपण आपले नाव निवडा आणि त्या तपशीलांवर क्लिक करा.
M. आपला सर्व तपशील नवीन टॅबमध्ये आपल्यासमोर उघडतील.
N. यानंतर आपल्याला खाली मतदार माहिती मुद्रित करण्याचा पर्याय दिसेल.  त्यावर क्लिक केल्याने पीडीएफ स्वरूपात डाउनलोड केले जाईल.
O. ही सर्व माहिती दिल्यानंतर शोध बटणावर क्लिक करा.
P. यानंतर, सर्व पाहिल्यानंतर आपल्या नावावर क्लिक करा.
Q. एकूण  सर्व निकालापासून आपण आपले नाव निवडा आणि त्या तपशीलांवर क्लिक करा.
R. आपला सर्व तपशील नवीन टॅबमध्ये आपल्यासमोर उघडतील.
S. यानंतर आपल्याला खाली मतदार माहिती मुद्रित करण्याचा पर्याय दिसेल.  त्यावर क्लिक केल्याने पीडीएफ स्वरूपात डाउनलोड केले जाईल.

आपला तपशील भरल्यानंतर  किंवा सर्व माहिती भरल्यानंतर आपली मतदार माहिती आपल्याला दिसत नसेल तर आपण निवडणूक आयोगाच्या टोल फ्री क्रमांकावर 1800111950 किंवा 1950 वर बोलू शकता आणि तक्रार देऊ शकता.

अश्याच चांगल्या माहितीसाठी आणि मराठी लेखांसाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here