दिल्लीतील लाल किल्ला परिसरात आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना अटक.

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली आहे.

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली असून सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या परिसरात दहशतवाद्यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने लाल किल्ला परिसरातील काश्मिरी गेट येथून परवेझ रशिद आणि जमशेद जहूर या दोन जणांना अटक केली.

हे दोघेही आयसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. दोघेही मूळच्या शोपियाँ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दोघांपैकी एकाच्या नातेवाईकाचा चकमकीत मृत्यू झाला होता. त्यानंतर दोघेही दहशतवादी संघटनेत सामील झाले. या दोघांचा काय कट होता, ते आयसिसच्या संपर्कात कसे आले याचा तपशील उघड झालेला नाही.