[flexy_breadcrumb]

Kinemaster Diamond MOD APK 4K, No Watermark

unlocked unlimited locked

Updated on

5 - (20)

जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे, आज आपण आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत सन 2022-२३ साठी जिल्हा नियोजन समितीने 2 कोटी 21 लाखांचा निधी मंजूर केला आहे. आज आपण या निधीतून जत तालुक्यात कोणकोणत्या गावांमध्ये कोणती विकास कामे करण्यात येणार आहे या बद्दल जाणून घेणार आहोत.

jath, sangli News

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जत तालुक्यासाठी 2022-23 या वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीने 2 कोटी 21 लाखांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी प्रदेशातील विविध विकासकामांसाठी वापरला जाईल, जसे की रस्ते, पूल बांधणे आणि सार्वजनिक सुविधा. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम हा एक सरकारी उपक्रम आहे ज्याचा उद्देश स्थानिक समुदायांना त्यांच्या विकास प्रकल्पांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. या निधीमुळे जत तालुक्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळून परिसरातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.

खाली दिलेल्या गावांमध्ये होणार कामे सुरु

गावाचे नावकामाचे नावरक्कम रु
( लक्ष )
वळसंगमौजे वळसंग ता . जत येथील संगतीर्थ दानम्मा देवी
मंदिराजवळ पिकअप शेड बांधणे .
४.०० लक्ष
बालगावमौजे बालगाव ता . जत येथील अल्लमप्रभू देवस्थान ते हनुमान मंदिर पर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसविणे व पिकअप शेड बांधणे .११.०० लक्ष
उंटवाडीमौजे उंटवाडी ता . जत येथील ज्योतिर्लिंग मंदिर
परिसरात सामाजिक सभागृह
१०.०० लक्ष
जतमौजे जत ता . जत येथील आर . आर . कॉलेज कडे
जाणारा रस्त
१५.०० लक्ष
वळसंगमौजे वळसंग ता . जत येथे दत्त मंदिर येथे सामाजिक
सभागृह
१०.०० लक्ष
जतमौजे जत , ता . जत येथील सुरेश कलमडी घरापासून ते पिंटू मगदूम यांच्यापर्यंत रस्ता खडीकरण मुरमीकरण करणे .१०.०० लक्ष
बोर्गी खुर्दमौजे बोर्गी खुर्द ता . जत येथील वडर समाजास सामाजिक सभागृह बांधणे .१०.०० लक्ष
बसर्गीमौजे बसर्गी ता . जत येथील विठ्ठल मंदीर परिसर सुशोभिकरण करणे .०५.०० लक्ष
एकुंडीमौजे एकुंडी ता . जत येथील एकुंडी ते बसवेश्वरमंदिर पर्यंत रस्ता ट्रिमिक्स करणे .०७.०० लक्ष
मौजे जालीहाळखुर्द मौजे जालीहाळ खुर्द ता . जत येथील शिंदे वस्ती ते
एगनाळ रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे
१०.०० लक्ष
अमृतवाडीमौजे अमृतवाडी ता . जत येथील अमृतवाडी ते पाच्छापूर ( साळुंखे ११.०० वस्ती ) मुरमीकरण व खडीकरण करणे .१०.०० लक्ष
खोजनवाडीमौजे खोजनवाडी ता . जत येथील खोजनवाडी कोट्टलगी रस्ता ते उंटवाडी रस्ता मुरमीकरण व खडीकरण करणे .१०.०० लक्ष

बिरनाळमौजे बिरनाळ ता . जत येथील बाबाजीआप्पा
देवस्थान येथे सभा मंडप बांधणे .
०८.५० लक्ष
हिवरेमौजे हिवरे ता . जत येथील बिरोबा मंदिर येथे सभा
मंडप बांधणे .
०८.५० लक्ष
बेवनूरमौजे बेवनूर ता . जत येथील बेवनूर काळेलवस्ती येथे
सभामंडप
०८.५० लक्ष
गुलगुंजनाळमौजे गुलगुंजनाळ ता . जत येथील जि.प मराठी व
कन्नड शाळा संरक्षण भिंत बांधणे
१०.०० लक्ष
दरीकोनुरमौजे दरीकोनुर ता . जत येथील हनुमान मंदिरा समोर
सभा मंडप
०८.५० लक्ष
आसंगीमौजे आसंगी जत ता . जत येथे शादीखाना बांधणे१०.०० लक्ष
जतमौजे जत ता . जत येथील लिंगायत स्मशान भूमी अंर्तगत डांबरीकरण करणे१०.०० लक्ष
को . बोबलादमौजे को . बोबलाद ता . जत येथील लिंगायत स्मशान
भूमी संरक्षण भिंत बांधणे
१०.०० लक्ष
काशिलिंगवाडीमौजे काशिलिंगवाडी ता . जत येथील मरी माता मंदिरा
समोर सभामंडप
०८.५० लक्ष
उटगीमौजे उटगी ता . जत येथील कोळी समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे .११.५० लक्ष
येळवीयेळवी ता . जत येथील खैराव रोड कृष्णानगर येथे एस.टी. पिक अप शेड बांधणे .४.०० लक्ष
आसंगी जतमौजे आसंगी जत ता . जत येथील विठ्ठल मंदिर समोर सामाजिक सभागृह बांधणे .१०.०० लक्ष

अश्या प्रकारे अनेक नवनवीन बातम्यांसाठी WhatsApp group वरती जॉईन व्हा.

अधिक पहा

म्हैशाळ उपसा सिंचन कालव्यातून मौजे हिवरे गावासाठी पाणी सोडावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवेदन

Leave a comment