मतदानाची शाई कशापासून बनवली जाते? व ती शाई पुसता का येत नाही?

मतदान केल्यावर लावण्यात येणारी शाई कशी, कोठून आणि का बनवली जाते याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.

4
voting ink full information, मतदानाची शाई INDELIBLE INK
मतदानाची शाई by MahaNews

आज 21 ऑक्टोबर  2019 रोजी महाराष्ट्रात विधानसभेचे मतदान होत आहे. असे मतदान प्रत्येक पाच वर्षांतून विधानसभा, लोकसभा, नगरपालिका,आणि ग्रामपंचायत अशा एकदा येणाऱ्या निवडणुका एखाद्या उत्सवाप्रमाणे असतात. या उत्सवात उतरणारा प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना खुश करण्यासाठी विविध प्रकारचे अमिष दाखवतात.

मग आपणही कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे यावर चर्चा करु लागतो. पाहता पाहता मतदानाचा दिवस उजाडतो आणि मतदाता मतदान केंद्रावर पोहोचतो.

तेथे मतदान करायला गेल्यावर आपल्या मतदान यादीमध्ये (Voter Id List 2019) नाव चेक केल्यावर मतदान करण्यापूर्वी आपल्या बोटावर निळ्या रंगाची शाई लावली जाते. परंतु या शाईबाबत आपल्या मनात अनेकदा कुतूहल निर्माण होते, कारण ही शाई रोजच्या वापरातील इतर शाईंप्रमाणे पुसली जात नाही. पण असे का होते?

मतदानाची शाई:

मतदानादरम्यान, बनावट/फर्जी मतदान किंवा कोणत्याही व्यक्तीस पुन्हा मत देण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या बोटावर शाई लावली जाते. या दरम्यान, मतदान करताना एक प्रश्न सतत आपल्याला येतो. तो म्हणजे आपलं मत किती सुरक्षित आहे? आपल्या नावावर दुसरे कोणी मतदान तर करणार नाही ना? ही भीती दूर करण्यासाठी मत देताना निवडणूक अधिकारी आपल्या बोटावर निळी शाई लावतात.

निळ्या शाईमुळं त्या व्यक्तीनं मत दिलं की नाही हे कळतं. ही शाई शोधण्याचे आणि आमलात आणण्याचे सगळे श्रेय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते.

परंतु ही शाई कोठे व कशी बनविली जाते हे आपल्याला माहिती आहे आणि या शाईचे वैशिष्ट्य काय आहे की केवळ या शाईचा उपयोग मतदानादरम्यान केला जातो?

मतदानाची शाई कोठे बनविली जाते?

ही शाई तयार करणारी कंपनी कर्नाटकची आहे. म्हैसूर पेंट्स आणि वार्निश लिमिटेड हे ह्या कंपनी चे नाव आहे. ही कंपनी कर्नाटक सरकारची असून देशातील प्रत्येक निवडणूकीत शाई पुरविली जाते. 10 एमएल शाईच्या एका बाटलीची किंमत १८३ रुपये एवढी आहे. ही शाई इतर कोणालाही विकत घेता येत नाही. MVPL द्वारे सरकारालाच ही शाई विकली जाते.

तशी ही कंपनी अनेक पेंट तयार करते. पण निवडणुकीतल्या शाईसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. मतदानासाठी विशेष शाई वापरण्याची युक्ती अंमलात आणण्याचं संपूर्ण श्रेय भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते. निवडणुकीची शाई या पदार्थाला ‘अमिट शाई’ असे नाव देण्यात आले. किंवा INDELIBLE INK म्हणून या शाईला ओळखले जाते.

सुमारे 56 वर्षांपूर्वी 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्यासाठी शाईचा प्रथम वापर केला गेला होता आणि आजही केली जातो. शाईच्या खुणा जवळजवळ कमीत-कमी ७२ तासांपर्यंत ही शाई पुसली जात नाही. 1962पासून या शाईचा वापर केला जात आहे. ही शाई इतर देशातही निर्यात केली जात आहे.

मतदानाची शाई, voting ink
मतदानाची शाई, voting ink

मतदानाची शाई कशापासून बनवली जाते व त्याचे वैशिष्ट्य:

मतदानाची शाई पुसता येत नाही. कारण या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट आणि अल्कोहोल यांचे मिश्रण असते. सूर्य प्रकाशाची किरणे येताच या शाईचा रासायनिक रंग बदलतो. ही शाई नेशनल फिजिकल लैबोरेटरी ऑफ इंडिया च्या केमिकल फॉर्म्युलाने तयार केली आहे.

मुख्यतः या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेटचा वापर केला जातो. ही शाई मालदीव, मलेशिया, कंबोडिया, अफगाणिस्तान, इजिप्त आणि दक्षिण आफ्रिका येथे निर्यात केली जाते. शाईच्या दरम्यान, ही शाई डाव्या हाताच्या अंगठ्याच्या बोटांच्या नखे ​​आणि फोरस्किनवर लागू होते.

ही शाई ४० सेकंदाच्या आत सुकून जाते. त्याची प्रक्रिया इतकी जलद होते की, एका सेकंदात त्याची छाप सोडून जाते. यामुळे ही शाई बोटावरून काढता येत नाही. ही शाई सिल्व्हर नायट्रेटमध्ये मिसळलेली असते, म्हणून ही शाई बेटावरून लवकर निघत नाही.

मतदानाची शाई का पुसता येत नाही?

या शाईत सिल्व्हर नायट्रेट या रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे ही शाई कमीत कमी 72 तासापर्यंत पुसली जात नाही. सिल्व्हर नायट्रेटचा पाण्याशी संपर्कात आला की त्याचा रंग काळा होतो आणि तो पुसला जात नाही. तसंच त्याचा संपर्क हा आपल्या शरिरातल्या क्षाराशी आल्यावर त्याचं सिल्वर क्लोराइडमध्ये रुपांतर होतं.

सिल्वर क्लोराइड पाण्यात विरघळत नाही. ते बोटाला चिटकून राहतं. ते साबणानंही निघत नाही. बोटाच्या पेशी जशा जुन्या होत जातात तसं तसं ही शाई निघू लागते. ही शाई 40 सेकंदाच्या आत सुकून जाते. त्याची प्रक्रिया इतकी जलद होते की एका सेकंदात त्याची छाप सोडून जाते. याच कारणांमुळं ही शाई बोटावरून काढता येत नाही.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here