Bike Taxi BAN IN DELHI

दिल्लीत राहणाऱ्या रहिवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. दिल्लीत खासगी बाईक टॅकेसी सेवेवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या निर्णयानंतर दिल्लीतील सामान्य नागरिकांना मोठा झटका बसला आहे.

CREDIT : GETTY IMAGES

दिल्ली (Delhi) वाहतूक विभागाने ओला, उबर, रॅपिडो सारख्या कंपन्या ज्या बाईक टॅक्सीची सेवा देतात, त्यांना सांगितले आहे की, त्यांचे चालक खासगी बाईक टॅक्सीचा वापर करतात. त्यांच्यावर तात्काळ बंदी घालावी'.

दिल्ली सरकारने म्हटले आहे की, 'दिल्लीत खासगी बाईक टॅक्सीतून भाडे तत्वावर प्रवाशांना नेणे गुन्हा ठरेल. मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच दिल्ली सरकारच्या नियमाच्या उल्लंघन केल्यास खासगी बाईक टॅक्सी चालकास १ लाख रुपयांचा दंड (Fine) आणि तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाहतूक विभागाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आली आहे. परिपत्रकात म्हटलं आहे की, पहिल्यांदा उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला ५००० रुपये दंड भरावा लागेल.

दुसऱ्यांदा उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला १०,००० रुपये दंड भरावा लागेल. त्याचबरोबर १ वर्षांचा तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो. त्याचबरोबर चालक ३ महिन्यांसाठी वाहन परवाना गमावू शकतो.

जाणून घ्या 

आणखीन माहिती