Maharashtra Board Exam 2023: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे. 10वी आणि 12वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी शेअर करण्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. शालेय मुख्याध्यापकांनी १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेमध्ये १० मिनिटे वेळ वाढवून मिळावा यासाठी महाराष्ट्र बोर्डाला अशी मागणी केली होती. परंतु महाराष्ट्र बोर्डाने पेपरफुटी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू झाल्यावर लगेच पेपर वाटावे असे सांगण्यात आले आहे. या मुळे विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळणार यासाठी पुढील १० मिनिटे वाढवून दयावी ही विनंती करण्यात आली आहे.
१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना दहा मिनिटं गमवावी लागणार आहे. परीक्षेआधी १० मिनिटे पेपर दिले जायचे परंतु या निर्णयामुळे पेपरफुटीची घटना घडत होती. या कारणांमुळे ही पद्धत बंद करण्यात आली आहे.
परीक्षेच्या पहिल्या मिनिटापूर्वी विद्यार्थ्यांच्या हातात पेपर दिला जाईल. विद्यार्थ्यांना पेपरच्या आधी अर्धा तास हजेरी लावावी लागणार आहे. या निर्णयाला पालकांनी विरोध केला आहे.
शिक्षणमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, बोर्ड कॉपीमुक्त व्हावा यासाठी ही पद्धत लागू करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. कॉपी पद्धत ही बोर्डाला लागलेली कीड आहे. ही कीड संपवण्यासाठी परीक्षेचे दहा मिनिटं कमी करण्यात आले आहेत.