तलाठी भरती 4122 जागांसाठी अर्ज सुरू, ही कागदपत्रे तयार ठेवा | Maharashtra Talathi Bharti 2023

MAHA NEWS

Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023 : जय महाराष्ट्र, आपला MAHNEWS.co.in मध्ये आपला स्वागत आहे, आज आपण तलाठीभरती बद्दल जाणून घेणार आहे, महाराष्ट्र राज्याकडून २०२३ मध्ये तलाठी भरती 4122 जागांसाठी महाभरती काढण्यात आली आहे, तरी इच्छुक उमेद्वारांसाठी सुवर्णसंधी आहे, या भरतीसाठी लागणारे कागतपत्रे जाणून घाण्यासाठी पुढील माहीत जाणून घ्या,

Maharashtra Talathi Bharti 2023

महाराट्र राज्य शासनाचे अधिकारी श्रीकांत मोहिते यांनी 29 नोव्हेंबरला स्वतंत्र घोषणा केली, तलाठी GR नुसार भरतीमध्ये एकूण 4122 पदांना मंजुरी मिळाली आहे. जानेवारी 2023 मध्ये जाहिरात काढून रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु होईल,

एकूण रिक्त जागा 4122 जागा

तलाठी सुरवातीचे पगार ३०.०००/- ते ३५.०००/- महिना,

शैक्षणिक पात्रता

  1. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेद्वारांचा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  2. शासनानूसार नमूद केलेल्या माहीतनुसार संगणक तंत्रज्ञान उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.( MS- CIT, CCC)
  3. तसेच उमेदवारांना मराठी व हिंदी भाषांचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.

परीक्षेचे स्वरूप

विषयप्रश्नगूण
मराठी ( मराठी)२५५०
इंग्रजी (English)२५ ५०
अंकगणित व बुद्धिमत्ता २५ ५०
सामान्यज्ञान२५ ५०
एकूण गूण १०० २००

उमेद्वारांसाठी वयोमर्यादा

  • उमेदवारचे वय १८ ते ३८ मध्ये असणे अनिवार्य आहे.
  • मागासवर्गीय उमेदवार वय १८ ते ४३ वर्ष
  • खेळाडू १८ ते ४३ वर्ष
  • प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / अपंग १८ ते ४५ वर्ष
  • माझी सैनिक १८ ते ४५ वर्ष

उमेद्वारांसाठी ही कागदपत्रे आवश्यक

  • शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )
  • 10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
  • 12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
  • पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
  • पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र
  • इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)
  • अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
  • जातीचा दाखला (Caste Certificate)
  • नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
  • जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
  • EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)

कोणत्या विभागात किती पदे भरणार ?

  • नाशिक – १०३५
  • औरंगाबाद – ८७४
  • कोकण – ७३१
  • नागपूर – ५८०
  • अमरावती – १८३
  • पुणे – ७४६

Leave a comment