हृदय विकाराच्या झटक्याने अनाथांची माय हरवली… पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे दुःखद निधन ( Sindhutai Sapkal Death )

आपल्या सामाजिक कार्याने संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जागतिक पातळीवर गाजविणाऱ्या जेष्ठ भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात निधन झाले ( Sindhutai Sapkal Death ). वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

सिंधुताई यांना प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ नोव्हेंबरला त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत कमी अधिक सुधारणा होत होती. त्यांनतर गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांना गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज रात्री ८ वाजून १० मिनिटांनी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले.   

पुण्यातील मांजरी येथे सकाळी ८ वाजल्यापासून त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. महानुभाव पंथाच्या त्या अनुयायी असल्याने दुपारी १२ वाजता ठोसर बागेत दफनविधी करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तियांनी दिली आहे.

 

जाणून घेऊया कोण होत्या सिंधुताई सपकाळ? ( Sindhutai Sapkal Information )

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *