शेअर गुंतवणूकदार झाले श्रीमंत : टाटा टेक्नॉलॉजीजने दिला 140% चा लिस्टिंग नफा (प्रॉफिट)

Manaw

tata tech ipo

शेअर बाजारात (मार्केट) टाटा समूहाची कंपनी टाटा टेक्नॉलॉजीजची धमाकेदार लिस्टिंग झाली. हा शेअर बीएसईवर (BSE) रु. 1199 च्या किमतीवर लिस्ट झाला आहे, तर IPO किंमत रु 500 होती. हा शेअर NSE वर 1200 रुपयांवर लिस्ट झाला आहे. याचा अर्थ, ते एक्सचेंजवर सूचीबद्ध (लिस्ट) होताच, गुंतवणूकदारांनी 140% चा धमाकेदार नफा (प्रॉफिट) कमावला. यापूर्वी आयपीओसाठीही विक्रमी अर्ज आले होते. टाटा कंपनीचा IPO जवळपास 20 वर्षांनंतर उघडला , जी गुंतवणूकदारांनी लगेचच स्वीकारली व भरपूर प्रतिसदणे गुंतवणूक केले. टाटा टेकचा आयपीओ शेवटच्या दिवशी जवळपास ७० वेळा बंद झाला. हा शेअर दीर्घकालीन (Long Term) गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर्स ठेवावेत.

Tata Group कंपनी Tata Technologies Limited चा IPO 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये गुंतवणूकदारांसाठी खुला होता. आज कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर म्हणजेच NSE आणि BSE वर पूर्व-विशेष सत्रात सूचीबद्ध केले गेले. कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी काही मिनिटांतच टाटा टेक्नॉलॉजीजचा IPO पूर्णपणे सबस्क्राइब झाला.

आज दिनांक 30-11-2023 रोजी कंपनीचे शेअर्स 410 टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध (लिस्ट ) झाले आहेत. कंपनीचे शेअर्स 500 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 140 टक्के प्रीमियमसह सूचीबद्ध आहेत. यावरून कंपनीच्या गुंतवणूकदारांना खूप फायदा झाल्याचे स्पष्ट होते. अभियांत्रिकी आणि उत्पादन विकास डिजिटल सेवा प्रदान करणार्‍या कंपनीचा समभाग BSE वर 1,199.95 रुपयांवर लिस्ट झाला, ज्याने 139.99 टक्क्यांची तीव्र उडी (प्रॉफिट ) नोंदवली. तो शेयर 180 टक्क्यांनी वाढून 1,400 रुपये झाला.

टाटा टेक शेयर आईपीओ (IPO)

कंपनीचा आयपीओ 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी खुला होता. कंपनीने 3,042.51 कोटी रुपयांचा IPO उघडला होता. कंपनीने IPO ची किंमत 475-500 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. कंपनीच्या टाटा टेक IPO ला गुंतवणूकदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. रेकॉर्डनुसार, कंपनीकडे 73.58 लाख IPO गुंतवणूकदारांचे अर्ज आले होते. एकूणच, कंपनीचा IPO 69.43 पट सबस्क्राइब झाला.

tata tech share
tata tech share

टाटा टेक्नॉलॉजी शेयर आईपीओ लिस्टिंग (IPO)

प्रकारमाहिती
टाटा IPO किंमत500 रुपये
लिस्टिंग किंमत1199.95 रुपये
शेयर लॉट साइज30 शेअर्स
लिस्टिंग नफा (प्रॉफिट )रु 21000/लॉट
IPO तारीख22 ते 24 नोव्हेंबर
IPO इश्यू किंमतरु 500/शेअर
इश्यू साइज3042.5 कोटी रुपये
शेयर लॉट साइज30 शेअर्स
सदस्यता69.43 वेळा

हे पण वाचा : असे डाउनलोड करा : CRPF ASI आणि Head Constable चे प्रवेशपत्र (admit card)

Leave a comment