10 December Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
10 December Dinvishesh

10 December Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (10 December Dinvishesh):

1868 : पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.

1901 : नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.

1906 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.

1916 : संगीत स्वयंवर या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

1978 : ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

1998 : अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.

2003 : भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये 35 वे शतक केले.

2008 : प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.

2014 : भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2015 : सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.

जन्मदिन:

1870 : इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांचा जन्म. (मृत्यू: 19 मे 1958)

1878 : स्वतंत्र पक्षाचे संस्थापक चक्रवर्ती राजगोपालचारी यांचा जन्म. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक. (मृत्यू: 25 डिसेंबर 1972)

1880 : प्राच्यविद्यापंडित श्रीपाद कृष्ण बेलवलकर यांचा जन्म. संस्कृत पंडित अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.  (मृत्यू: 8 जानेवारी 1967 – पुणे).

1892 : मराठी नाट्य-अभिनेते आणि गायक बापूराव पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: 15 मार्च 1937)

1908 : भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म.

1957 : भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1896 : स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते अल्फ्रेड नोबेल यांचे निधन. (जन्म: 21 ऑक्टोबर 1833).

1920 : डॉज मोटर कंपनी चे एक संस्थापक होरॅस डॉज यांचे निधन. (जन्म: 17 मे 1868).

1953 : भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1872).

1955 : प्रज्ञावंत भाष्यकार आणि गांधीवादी तत्वचिंतक आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर यांचा इस्लामपूर येथे दम्याच्या विकाराने निधन. (जन्म: 26 सप्टेंबर 1894).

1963 : इतिहास पंडित सरदार के. एम. पणीक्कर यांचे निधन. (जन्म: 3 जून 1895).

1964 : ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते यांचे निधन. (जन्म: 17 ऑगस्ट 1905).

1999 : क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन यांचे निधन. (जन्म: 14 मे 1922).

2001 : चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली उर्फ दादामुनी यांचे निधन. (जन्म: 13 ऑक्टोबर 1911).

2003 : संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे निधन.

2009 : लेखक आणि कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे निधन. (जन्म: 17 सप्टेंबर 1938).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here