14 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
14 November Dinvishesh
14 November Dinvishesh

14 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (14 November Dinvishesh):

1979 : जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.

1922 : ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.

1940 : दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.

1969 : जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना.

1971 : मरीनर –9  या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.

1975 : स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.

1991 : जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची 1990 च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

2013 : सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (200 वाकसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.

जन्मदिन:

1650 : इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: 8 मार्च 1702)

1719 : ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक लिओपोल्ड मोत्झार्ट यांचा जन्म. (मृत्यू: 28 मे 1787)

1765 : वाफेवर चालणाऱ्या जहाजीचे निर्माते रॉबर्ट फुल्टन यांचा जन्म. अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणतीराचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला. (मृत्यू: 24 फेब्रुवारी 1815 – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

1863 : अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड यांचा जन्म. 1909 मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन ’बॅकेलाईट’ नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1944 – बेकन, डचेस, न्यूयॉर्क, यू. एस. ए.)

1889 : भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू (भारतरत्‍न) यांचा जन्म. (मृत्यू: 27 मे 1964)

1891 : पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciencesअध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: 10 एप्रिल 1949 – पुणे)

1904 : इंग्लिश क्रिकेटपटू हेरॉल्ड लारवूड यांचा जन्म. (मृत्यू: 22 जुलै 1995)

1918 : चित्रकार रघुवीर मूळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑगस्ट 1976)

1919 : स्वातंत्र्यसैनिक, लेखक दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग अनंत काशिनाथ भालेराव यांचा जन्म. (मृत्यू: 26 ऑक्टोबर 1991)

1922 : संयुक्त राष्ट्रांचे 6 वे सरचिटणीस ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली यांचा जन्म.

1924 : कथ्थक नर्तिका रोहिणी भाटे यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑक्टोबर 2008)

1935 : नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: 7 फेब्रुवारी 1999)

1947 : भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1998)

1971 : ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट यांचा जन्म.

1974 : क्रिकेटपटू हृषिकेश कानिटकर यांचा जन्म.

मृत्यूदिन:

1915 : अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ बुकर टी. वॉशिंग्टन यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1856)

1966 : क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचे निधन. (जन्म: 31 ऑक्टोबर 1895)

1971 : कादंबरीकार, चित्रपट कथालेखक नारायण हरी आपटे यांचे निधन. (जन्म: 11 जुलै 1889 – समडोळी, जिल्हा सांगली)

1877 : हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचे निधन. (जन्म: 1 सप्टेंबर 1896)

1993 : स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींचे सच्‍चे अनुयायी, ग्रामीण विकासाचा पाया घालणारे सामाजिक कार्यकर्ते, दुधाचा महापूर योजनेचे एक शिल्पकार डॉ. मणिभाई भीमभाई देसाई यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1920)

2000 : गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: 5 नोव्हेंबर 1929).

2013 : भारतीय पत्रकार आणि लेखकहरि कृष्ण देवसरे यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1938).

2015 : भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन.

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here