16 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.
प्रमुख घटना (16 November Dinvishesh):
1868 : लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
1893 : डॉ. अॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.
1907 : ओक्लाहोमा हे अमेरिकेचे 46 वे राज्य बनले.
1914 : अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.
1915 : लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह 7 जणांना फाशी देण्यात आली.
1930 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
1945 : युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
1988 : 11 वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
1996 : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.
1996: चतुरंग प्रतिष्ठान च्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड.
1997 : अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
2000 : कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
2013 : 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (40) मिळाला.
जन्मदिन:
ई. पु. 42: रोमन सम्राट तिबेरीयस यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 37)
1836 : हवाईचा राजा डेविड कालाकौआ यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1891)
1894 : केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1975)
1897 : भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म. (मृत्यू: 3 फेब्रुवारी 1951)
1904 : नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकीवे यांचा जन्म. (मृत्यू: 11 मे 1996)
1909 : भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म. (मृत्यू: 9 जुन 1982)
1917: संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचा जन्म. (मृत्यू: 14 जानेवारी 1991)
1927 : मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म. ‘नटसम्राट’, ’हिमालयाची सावली’, ’किरवंत’, ’क्षितीजापासून समुद्र’ इ. अनेक नाटकांतील प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवणारे कलावंत, मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार.
1928 : मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म. (मृत्यू: 29 जुलै 2006)
1930 : इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म. (मृत्यू: 11 जुन 1997)
1963 : अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म.
1968 : भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म. (मृत्यू: 24 एप्रिल 2014)
1973 : बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म.
मृत्यूदिन:
1915 : गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह 7 जणांना फाशी देण्यात आले.
1947 : व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचे निधन. (जन्म: 19 नोव्हेंबर 1877)
1950 : अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस चे एक संस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचे निधन. (जन्म: 8 ऑगस्ट 1879)
1960 : अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचे निधन. (जन्म: 01 फेब्रुवारी 1901)
1967 : संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचे निधन. (जन्म: 14 जुलै 1917)
2006 : नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे निधन. (जन्म: 31 जुलै 1912)
2015 : प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.
नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.