18 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
18 November Dinvishesh
18 November Dinvishesh

18 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (18 November Dinvishesh):

1493 : ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.

1809 : फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.

1882 : अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत सौभद्र हे नाटक रंगभूमीवर आले.

1905 : लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे 17 वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.

1918 : लाटव्हियाने आपण रशियापासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

1928 : वॉल्ट डिस्‍ने यांच्या मिकीमाऊस या प्रसिद्ध कार्टूनचा स्टीमबोट विली या चित्रपटाद्वारे जन्म.

1933 : प्रभात चा पहिलाच रंगीत चित्रपट सैरंध्री प्रदर्शित झाला.

1955 : भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.

1962 : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

1963 : पहिल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.

1992 : ललित मोहन शर्मा यांनी भारताचे 24 वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

1993 : दक्षिण अफ्रिकेत 21 राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.

2015 : टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला.

2015 : भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.

जन्मदिन:

1898 : भारताचा अतिप्राचीन इतिहास प्रबोध चंद्र बागची यांचा जन्म.

1901 : चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑक्टोबर 1990).

1906 : मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म. (मृत्यू: 2 ऑक्टोबर 1988).

1909 : कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑक्टोबर 1976).

1910 : क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म. (मृत्यू: 20 जुलै 1965).

1931 : हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य श्रीकांत वर्मा यांचा जन्म.

1945 : श्रीलंकेचे 6 वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख महिंदा राजपक्षे यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1772 : मराठा साम्राज्यातील 4 था पेशवा माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव पेशवे यांचे निधन. (जन्म: 16 फेब्रुवारी 1745).

1830 : इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन. (जन्म: 6 फेब्रुवारी 1748).

1936 : भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन. (जन्म: 5 सप्टेंबर 1872).

1962 : अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्‍या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक नील्स बोहर यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1885).

1993 : लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद यांचे निधन.

1996 : समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन.

1998 : भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचे निधन. (जन्म: 15 नोव्हेंबर 1936).

1998 : सातार्‍याच्या सामाजिक समाजसेवक रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले यांचे निधन.

1999: स्वातंत्र्यसैनिक रामसिंह रतनसिंह परदेशी यांचे निधन.

2001 : नाडेप कंपोस्ट खताचे जनक नारायण देवराव पांढरीपांडे तथा नाडेप काका यांचे निधन.

2006 : मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचे निधन. (जन्म: 6 एप्रिल 1917).

2013 : भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन. (जन्म: 15 मार्च 1929).

2014 : भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या यांचे निधन.

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here