22 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
22 November Dinvishesh
22 November Dinvishesh

22 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (22 November Dinvishesh):

1858 : कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना.

1943 : लेबनॉन फ्रान्सपासुन स्वतंत्र झाला.

1948 : मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा.

1956 : ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे 16 व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.

1963 : थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन.

1963: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या.

1968 : द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.

1986 : भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत 34 वे शतक केले.

1991 : डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या 61 आदिवासींचा होरपळून मृत्यू.

1997 : नायजेरियात मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात 100 ठार.

2005 : अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.

2013 : भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा 22 वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.

जन्मदिन:

1808 : पर्यटन व्यवस्थापक थॉमस कूक यांचा जन्म. (मृत्यू: 18 जुलै 1892).

1877 : एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1930)

1880 : धर्मरहस्यकार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म. ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाङ्‍मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: 6 ऑक्टोबर1956).

1885 : पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑक्टोबर 1951)

1890 : फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचा जन्म. (मृत्यू: 9 नोव्हेंबर 1970)

1909 : स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द. शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑगस्ट 1998)

1913 : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म. (मृत्यू: 16 जानेवारी 1988 – पुणे)

1915 : चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा जन्म. (मृत्यू: 22 ऑगस्ट 1980)

1922 : साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.

1926 : मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: 28 ऑगस्ट 2007)

1939 : उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ नेते मुलामसिंह यादव यांचा जन्म. (माजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री)

1943 : अमेरिकन लॉनटेनिस पटू बिली जीन किंग यांचा जन्म.

1967 : 6 वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉनटेनिस पटू बोरिस बेकर यांचा जन्म.

1968 : पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.

1970: श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार मार्वन अट्टापट्टू यांचा जन्म.

1980 : नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1902 : जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप्प यांचे निधन. (जन्म: 17 फेब्रुवारी 1854)

1920 : कवी व संपादक एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे निधन.

1844 : खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.

1957 : नाट्यकर्मी पार्श्वनाथ आळतेकर यांचे निधन. (जन्म: 14 सप्टेंबर 1897)

1963 : इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचे निधन. (जन्म: 26 जुलै 1894)

1963 : अमेरिकेचे 35 वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या. (जन्म: 29 मे 1917)

1980 : हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती मे वेस्ट यांचे निधन. (जन्म: 17 ऑगस्ट 1893)

2000 : अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1912)

2002 : हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.

2008 : गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचे निधन. (जन्म: 17 सप्टेंबर 1939).

2012 : मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचे निधन. (जन्म: 23 मे 1926).

2016 : भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: 6 जुलै 1930).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here