23 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
23 November Dinvishesh
23 November Dinvishesh

23 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (23 November Dinvishesh):

1924 : एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.

1936 : लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.

1955 : कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.

1971 : चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.

1992 : आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.

1999 : नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.

जन्मदिन:

870 : बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: 6 जून 913).

1755 : लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: 13 जानेवारी 1832).

1882 : उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: 8 एप्रिल 1953).

1897 : साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (1975) बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. 1951 मधे त्यांचे ’अ‍ॅन आटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या 14 आवृत्त्या निघाल्या. (मृत्यू: 1 ऑगस्ट 1999 – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड).

1923 : लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑक्टोबर 2002).

1926 : आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: 24 एप्रिल 2011).

1930 : अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: 20जुलै 1972).

1961 : पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.

1967 : दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.

1984 : अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1937 : नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1858).

1959 : अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: 12 मार्च 1891).

1970 : सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1910).

1979 : भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: 19 फेब्रुवारी 1911).

1993 : पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्‍या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: 13 एप्रिल 1905 – व्हेनिस, ईटली).

1999 : अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.

2000 : चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: 28 जून 1928 – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र).

2006 : झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला  यांचे निधन. (जन्म: 14 नोव्हेंबर 1936).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here