27 November Dinvishesh – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
27 November Dinvishesh
27 November Dinvishesh

27 November Dinvishesh 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (27 November Dinvishesh):

1815 : पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.

1839 : बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन ची स्थापना.

1944 : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन 70 जण ठार झाले.

1995 : पाँडेचरीमधील ’व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर’ मधील शात्रज्ञांनी शोधलेले ’थोम्ब्रिनेज’ हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले.

1995 : गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर.

2016 : निको रोसबर्ग 2016 फोर्मुला 1 चा चाम्पियान बनला.

जन्मदिन:

1701 : स्वीडिश खगोलशास्त्र व संशोधक अँडर्स सेल्सियस यांचा जन्म.

1871 : इटालियन भौतिकशास्रज्ञ जियोव्हानी जॉर्जी यांचा जन्म.

1857 : नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: 4 मार्च 1952 – इस्ट्बोर्न, ससेक्स, लंडन, इंग्लंड)

1870 : इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस यांचा जन्म.

1874 : इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचा जन्म. (मृत्यू: 9 नोव्हेंबर 1952)

1878 : भारतीय कवि आणि समीक्षक जतिंद्रमोहन बागची यांचा जन्म. (मृत्यू: 1 फेब्रुवारी 1948)

1881 : प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑगस्ट 1937)

1888: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म.

1894 : पॅनासोनिक चे संस्थापक कोनसुके मात्सुशिता यांचा जन्म. (मृत्यू: 27 एप्रिल 1989)

1903 : नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ लार्स ऑन्सेगर यांचा जन्म.

1907 : विख्यात हिंदी साहित्यिक हरीवंशराय बच्चन यांचा जन्म. (मृत्यू: 18 जानेवारी 2003)

1909 : रशियन गणितज्ञ अनातोली माल्त्सेव यांचा जन्म.

1915 : मराठी कथा कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण उर्फ दी. बा. मोकाशी यांचा उरण, रायगड येथे जन्म. साहित्यिक, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ’फॉर हूम द बेल टोल्स‘ या कादंबरीचा ’घणघणतो घंटानाद’ हा त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे. (मृत्यू: 29 जून 1981)

1940 : अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ ब्रूस ली यांचा जन्म. (मृत्यू: 20 जुलै 1973)

1952 : भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते बॅप्पी लाहिरी यांचा जन्म.

1986 : भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1754 : फ्रेन्च गणिती अब्राहम डी. मुआव्हर यांचे निधन. (जन्म: 26 मे 1676)

1952 : तत्वचिंतक अहिताग्नी राजवाडे यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1879).

1967 : गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष लेओन मब्बा यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1992).

1975 : गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1925).

1976 : प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक, कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकर तथा गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे निधन. (जन्म: 28 डिसेंबर 1899)

1978 : भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन. (जन्म: 6 जुलै 1905)

1994 : स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूल चे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन. (जन्म: 28 मे 1907 – महाड, रायगड).

1995 : दूरदर्शन व चित्रपट कलावंत संजय जोग यांचे निधन.

2000 : साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचे निधन. (जन्म: 26 मार्च 1909).

2002 : भारतीय कवी आणि शैक्षणिक शिवमंगल सिंग सुमन यांचे निधन. (जन्म: 5 ऑगस्ट 1915).

2007 : गेटोरेड चे सहनिर्माते रॉबर्ट केड यांचे निधन. (जन्म: 26 सप्टेंबर 1927).

2008 : भारताचे 7 वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन. (जन्म: 25 जून 1931).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here