Home Blog

१४ एप्रिल २०२२पर्यंत आंबेडकर स्मारकाचं काम पूर्ण करू: अजित पवार

0
ambedkar smarak ajit pawar
ambedkar smarak ajit pawar

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाच्या काही परवानग्या रखडल्या आहेत. या परवानग्यांचा केंद्राशी काहीही संबंध नसून राज्यस्तरावरील या परवानग्या आहेत. त्या लवकरच देण्यात येतील आणि येत्या दोन वर्षात म्हणजे १४ एप्रिल २०२२ पर्यंत या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अजित पवार यांनी आज इंदू मिलमध्ये येऊन आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली. त्याआधी पवार यांनी चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

इंदू मिलमधील स्मारकाच्या कामात कोणत्याही अडचणी येणार नाही. या स्मारकासाठी काही परवानग्या बाकी आहेत. राज्यस्तरावरच्या या परवानग्या बाकी असून त्या आम्ही लवकरात लवकर देऊ. स्मारकाच्या बाबतीत काही निर्णय मागच्या सरकारमध्ये ठरावीक पातळीवर घेतले होते. कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता देण्यात आली नव्हती. आम्ही लवकरच या निर्णयाला कॅबिनेटमध्ये मान्यता देऊ. स्मारकाच्या परवानग्यांपासून ते इतर गोष्टी या महिन्यातच पूर्ण करण्यात येणार येईल. स्मारकासाठी जितका निधी लागेल तेवढा देण्यात येणार असून १४ एप्रिल २०२२पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले. मी कुणाच्याही कामाचं ऑडिट करायला आलो नाही. कामाची पाहणी करायला आलो आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्जमाफ करा : आडम मास्तर

0
riksha karj mafi

सोलापूर (३० डिसेंबर) – शासनाने मोठमोठ्या उद्योजकांचे कर्जमाफ केले, त्यांना कोट्यवधी रुपयांची सवलती दिल्या, ११ लाख कोटी रुपयांची थकबाबी देशातील मूठभर श्रीमंताकडे आहे. याची वसूल करण्याची ईच्छाशक्ती सरकारकडे नाही, अशी टीका करीत शेतकऱ्यांच्या धर्तीवर रिक्षा चालकांचे कर्ज माफ करा.अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केले.

रिक्षाचालक संघटना कृती समितीच्या वतीने रिक्षाचालकांच्या विविध प्रलंबित न्याय हक्काच्या मागण्या घेऊन आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली सलीम मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांना शिष्टमंडळामार्फत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी रिक्षाचालकांच्या विविध मागण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत जिल्हा परिवहन प्राधिकरणाची बैठक कृती समितीसोबत बोलावून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

यावेळी शिष्टमंडळात आरिफ मणियार, अजीज खान,सुनील भोसले,अनिल मोरे,रफिक पिरजादे, अकबर लालकोट, चाँद मुजावर, वसीम देशमुख, जावेद शेख, महेश पेंटर, रशीद मैंदर्गी, जविर सौदागर, सैफन मकानदार, कमलाकर आदी उपस्थित होते.

आडम म्हणाले की, अहोरात्र प्रवाश्यांना सेवा देणारे रिक्षाचालक कर्जामुळे हतबल झालेले आहेत. कर्जाच्या विळख्यातुन जर रिक्षाचालकांची मुक्तता नाही केल्यास महाराष्ट्रातील १५ लाख रिक्षाचालक रस्त्यावर उतरतील आणि येत्या ८ जानेवारी रोजीच्या देशव्यापी संपात सहभागी होतील असा इशाराही दिले.

बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल – सयाजी शिंदे

0
Sayaji Shinde
Sayaji Shinde

बीड – शहराजवळ सह्याद्री देवराई प्रकल्पातून ऑक्‍सिजन झोन तयार केला जात आहे. परिसरात विशिष्ट जातींची झाडे चिटकून लावली जात असून, यातून भविष्यात घनदाट जंगलाची निर्मिती केली जाणार आहे. परिसरात लिंब, पिंपळ, वड यासह विविध जातींची झाडे लावली जात आहेत.

बीड – शहराजवळच्या पालवण येथे शासनाच्या वनविभागासह लोकसहभागातून सह्याद्री देवराई हा प्रकल्प तीन वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. वृक्षसंगोपनाची चळवळ अधिकाधिक व्यापक व्हावी, या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात आहे. दोन वर्षांत या ठिकाणी एक लाख 64 हजार विविध जातींच्या वृक्षांची लागवड केली गेली आहे. 207 हेक्‍टर क्षेत्राचा हा परिसर लोकसहभागातून पूर्ण केला जात आहे. पालवणचा सह्याद्री देवराई हा प्रकल्प लवकरच सबंध महाराष्ट्रासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्‍वास अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.

सह्याद्री देवराई परिसरात शनिवारी (ता. 21) सायंकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लेखक, पटकथा दिग्दर्शक अरविंद जगताप यांच्यासह शिल्पकार किशोर ठाकूर, सतीश मोरे, सचिन चंदने, वृक्षतज्ज्ञ रघुनाथ ढोले, सह्याद्री देवराई प्रकल्पाचे सचिव मधुकर फल्ले (सातारा) यांच्यासह शिवराम घोडके, बीडच्या सहायक वनअधिकारी सोनाली वनवे उपस्थित होत्या. यावेळी डोंगर रांगेत वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली.

सयाजी शिंदे म्हणाले, सह्याद्री देवराई प्रकल्पातून ऑक्‍सिजन झोन तयार केला जात आहे. परिसरात विशिष्ट जातींची झाडे चिटकून लावली जात असून, यातून भविष्यात घनदाट जंगलाची निर्मिती केली जाणार आहे. परिसरात लिंब, पिंपळ, वड यासह विविध जातींची झाडे लावली जात आहेत. “येऊन, येऊन येणार कोण? झाडांशिवाय हायच कोण?’ ही टॅगलाइन घेऊन आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. स्थानिकांनीही या चळवळीत पुढाकार घ्यावा.

जानेवारीत पालवनला पहिले वृक्षसंमेलन
सह्याद्री देवराई प्रकल्प अधिक परिणामकारक पद्धतीने राबवला जात असून, या ठिकाणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्राचे पहिले वृक्षसंमेलन होणार असल्याची माहिती सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांनी दिली. संमेलनाच्या तयारीसाठी व्यापक बैठका घेतल्या जात असून, बीडकरांनीही यासाठी पुढाकार घ्यावा. संमेलनात जिल्ह्यातील अनेक शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार असून, याठिकाणी किमान 50 स्टॉल उभारले जाणार आहेत. त्यात फुलपाखरांच्या विविध जातींचे छायाचित्र प्रदर्शन भरवले जाणार आहे.

(Download PDF) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती

0
nabard recruitment

MahaNews : Nabard Recruitment 2019 – नॅशनल बँक ऑफ ऍग्रीकल्चर हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. नाबार्ड तर्फे अधिकृत रित्या 73 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. दहावी परीक्षा उत्तीर्ण असलेले पात्र विद्यार्थी 12 जानेवारी 2020 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

Nabard Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक:  05/Office Attendant/2019-20.

एकूण रिक्त जागा: 73 जागा.

पदाचे नाव: कार्यालय परिचर-ग्रुप ‘C’ (ऑफिस अटेंडंट)

शैक्षणिक पात्रता आणि अटी: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: उमेदवाराचे वय 01 डिसेंबर 2019 रोजी 18 ते 30 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: General/OBC: Rs. 450/-

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 12 जानेवारी 2020.

अधिकृत संकेतस्थळ: https://www.nabard.org/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online here at https://ibpsonline.ibps.in/nabaoasdec19/

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: Download PDF at https://drive.google.com/open?id=1phQQqTwKFJW_4ZfQZjIYiSFyUAqHrI 8 (टीप: लिंक ओपन होत नसेल तर कॉपी करुन ब्राउझर वर पेस्ट करा.)

Nabard r

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण NABARD च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

रखडलेली कामे पूर्ण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा : खा.डॉ. अमोल कोल्हे

0
डॉ. अमोल कोल्हे
डॉ. अमोल कोल्हे

पुणे – अनेक महिन्यांपासून रखडलेले मांजरी येथील रस्त्याच्या चौपदरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम पुढील दीड महिन्यात पूर्ण करा अन्यथा याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.

मांजरी येथील मगर महाविद्यालय ते रेल्वे फाटका पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम जवळपास दोन-अडीच वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्यावरील भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले असले तरी रस्त्यात असलेले वीजेचे खांब व डी.पी. स्थलांतरीत करण्याचे काम बऱ्याच काळापासून रखडले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर खा. डॉ. कोल्हे यांनी नुकतीच या रस्त्याच्या कामाची जातीने पाहाणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अभियंते तसेच संबंधित ठेकेदार, सिरम कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सिरम कंपनीच्या सहकार्याने सीएसआर फंडातून या रस्त्याचे काम सुरू असून केवळ सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात परस्पर समन्वय नसल्याने हे काम रखडले आहे. त्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास व मनस्ताप सहन करावा लागतो आहे, याची गंभीर दखल खा. डॉ. कोल्हे यांनी घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थिती पाहून कामातील दिरंगाईबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. तसेच येत्या दीड महिन्यात वीज मंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कामे पूर्ण करावीत अन्यथा मला संबंधितांवर कडक कारवाईची मागणी करावी लागेल असा इशारा दिला.

या बाबतची क्षेत्र पाहणी करताना डॉ. अमोल कोल्हे (खासदार, शिरूर लोकसभा.),श्री.धर्मा नायडू ( सिरम कं. ऑफिसर).,श्री. एच आर चौघुले (सहा.अभि -सा.बा,हवेली),श्री.देवेन मोरे (कनिष्ठ अभि – सा.बा, हवेली),श्री. दांडगे (महावितरण विभाग),निखिल कॉन्स्ट्रुक्शन (रोड कॉन्ट्रॅक्टर),श्री. महेश दांडगे (इतर कार्य. अभि.महावितरण,उपविभाग,पुणे),श्री.जगनाळे (कॉन्ट्रॅक्टर महावितरण )

अमेरीकेत सांगलीकरांने आपल्या स्वप्नातील गाडीचा नंबर घेतला MH-10

0
ankur mali atlanta
ankur mali atlanta

कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त सातासमुद्रापार परदेशी गेलेल्या भारतीयांना आपल्या गावची ओढ कायमचं असते. गावची आठवण रोज डोळ्यासमोर दिसावी यासाठी अमेरिकास्थीत असणाऱ्या एका सांगलीकराने चारचाकी गाडीचा नंबर चक्क “एमएच-10′ घेतला आहे . इतकंच नव्हे तर वडिलांच्या आठवणीसाठी त्यांच्या नावाची “एएलएम’ अशी अक्षरं अवर्जून घेतली आहेत. अंकुर अर्जुन माळी असे त्या अवल्लीयाचे नाव आहे.

लहानपणापासूनच शिक्षणाची आवड

अंकुर मूळचे कळंबी ( ता . मिरज ) येथील आहेत . वडील अर्जुन लक्ष्मण माळी आणि आई कळंबी गावच्या संरपंच माणिकताई अर्जुन माळी दोघंही शिक्षकी पेशा होते . त्यामुळे लहानपणापासूनच शिक्षणाचा वसा त्यांच्याकडे होता . प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत झाले . त्यानंतर संगणक अभियंता म्हणून ते काम करून लागले .

अभियंता मिरज ते अमेरिका
अमेरिकेतील अँटलांटामध्ये वरिष्ठ अभियंता म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली . मिरज तालुक्‍यातील एका छोट्या खेडेगावातील मुलगा अमेरिकेत नोकरीसाठी गेल्याने चांगलाच नावलौकिक मिळला होता . विवाहानंतर अंकुर यांची पत्नी शुभांगी व मुलगी शिवन्या त्याच्यासोबतच अँटलांटामध्ये राहतात .

गावच्या आठवणीसीठी अणाेखी शक्कल

अमेरिकेतून सांगलीत वारंवार येणे त्यांना जमत नाही . पण , सांगलीची आठवण कायम त्यांच्या मनात यायची . आपली सांगली आपल्या सोबत कायम रहावी , असे त्यांना वाटायचे . यासाठी त्यांनी चारचाकी गाडी खरेदी केल्यानंतर जाणीवपूर्वक ” एमएच 10′ क्रमांक घेतला . त्यापुढे तीन अक्षरे टाकयची होती . त्यातही त्यांनी वडिलांच्या आठवणीसाठी ” एएलएम ‘ ( अर्जुन लक्ष्मण माळी ) अशी अक्षरे घेतली . तेथील आरटीओ विभागाने त्याला परवानगीही दिली . अँटलांटामध्ये ” एमएम -10’ पासिंग गाडी धावती आहे .

सांगलीच्या आठवणी ताज्या झाल्या

” अमेरिकेत लायसन्स्‌ मिळावण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात . पक्के लायसन्स्‌ मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला जातो . गाडी खरेदी केल्यानंतर अमेरिकेत आपल्या आवडीचा नंबर घेवू शकतो . तो नंबर यापूर्वी कोणीही घेतला नसले , तर तो नंबर आपल्याला मिळतो . यानिमित्ताने सांगलीच्या आठवणी माझ्यासमोर उभ्या राहतात .”
– अंकुर माळी

शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज होणार माफ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
Mukhyamantri
Mukhyamantri

नागपूर (२१ डिसेंबर) – शेतकऱ्यांचे २ लाखपर्यंतची कर्जमाफी कोणत्याही अटी शर्ती विना ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच सर्व थकीत कर्ज माफ करणार असल्याची घोषणा विधासभेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

तसेच ते म्हणाले की, गोरगरीबांना १० रुपयामध्ये शिवभोजन योजना सुरु करणार. प्रायोगिक तत्वावर ५० ठिकाणी सुरु करणार. वर्तमानपत्राचा दाखला देऊन विदर्भाचा विकास झालेला नाही हे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. तुम्ही काम केलेलं नाही असं मी कुठेही म्हटलेलं नाही. विदर्भाचा मी नातू आहे. आजोळचे आशिर्वाद माझ्यासाठी महत्वाचा आहे. विदर्भाच्या विकासात कुठलीही कसूर ठेवणार नाही. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

देशहितासाठी खूप काही सहन करावा लागतं : पंतप्रधान मोदी

0
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नईदिल्ली (२० डिसेंबर) – देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरु असून हे सर्व सहजतेने होत नाही. यासाठी खूप काही सहन करावं लागतं, पण देशासाठी करावं लागतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते दिल्लीत द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इन्डस्ट्रीज ऑफ इंडियाच्या (असोचम) कार्यक्रमात बोलत होते.
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन गुरुवारी चिघळलं. विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारातील आंदोलनाची धग देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनऊ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांच्या गोळीबारात लखनऊमध्ये एक तर मंगळूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे नागरिकत्व कायदा धाडसी निर्णय असल्याचं म्हटलं आहे.
मोदी पुढे म्हणाले कि, देशाला संकटातून बाहेर काढताना अनेक लोकांचा संताप सहन करावा लागतो. आपल्यावर होणारे आरोप सहन करावे लागतात. पण हे सर्व घडत असतानाही देशासाठी करावं लागतं. ७० वर्षांची सवय बदलण्यासाठी वेळ लागतो. पण, देशासाठी करावं लागतं”. नरेंद्र मोदी यांनी थेटपणे नागरिकत्व कायद्याचा उल्लेख केला नाही. मात्र अप्रत्यक्षपणे आपलं म्हणणं मांडलं. त्यांनी सांगितलं की, “सगळं असंच झालं असेल का ? अनेक लोकांची नाराजी ओढावून घ्यावी लागते. अनेक आरोप होतात. पण देशासाठी करायचं असल्याने हे सर्व सहन करावं लागतं”. नरेंद्र मोदी अर्थव्यवस्थेसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांवर बोलत होते. मात्र त्यांचा इशारा अप्रत्यक्षपणे देशभरात नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनावर होता असं बोललं जात आहे.

दगड खाणीवरील रॉयल्टी माफी तसेच दंडात्मक कारवाई न करण्याची मागणी

0
दगड खाणीवरील रॉयल्टी
दगड खाणीवरील रॉयल्टी

नागपूर (१९ डिसेंबर) – वडार समाजाच्या दगड खाणीवरील बंद काळातील रॉयल्टी माफ करून त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये अशी मागणी नागपूर येथील विधानसभेत आमदार प्रणिती शिंदे यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

यामध्ये सोलापूरात वडार समाज हा गेली अनेक वर्षे व्यवसाय करीत असून या समाजाची लोकसंख्या सुमारे 70 ते 90 हजारांच्या आसपास आहे. हा समाज गरीब कष्टकरी असून पोट भरण्यासाठी गावोगावी भटकंती करीत असतात. त्यामुळे हा समाज अशिक्षित राहिलेला असून अत्यंत हलाकीचे जीवन जगत आहे. सोलापूर जिल्ह्यातील दगड खाणी माळढोक अभयारण्यासाठी बंद केल्यामुळे या दगडखाणीवर अवलंबून असलेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या जवळपास दिड लाख कामगारांचा रोजगार हिरावून घेतल्याने चालू स्थितीतील दगड खाणीतील उत्पादन शासनाच्या 12 जुलै 2006 रोजीच्या आदेशाने बंद केल्याने 12 दगड खाणीतील मजूरांना उपासमारीमुळे जगणे कठिण झालेले आहे.

सदर खाणीचे जमिनी हे गायरान जमिनी किंवा सरकारी जमिनी नसून सदरच्या खाणीकरीता असलेल्या जमिनी हे स्वमालकीचे कर्जे काढून घेतल्यामुळे या कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर असताना रॉयल्टी म्हणून शासन त्यांना दोनशे पटीने वारंवार वाढविले जाते.

प्रत्येक जाती जमातीत पूर्वापार पिढीजात चालत असलेला एक व्यवयाय असून त्यांच्याशी त्यांच्या प्रथा, रुढी व संस्कृती जोडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याचा समाज देखील दगड फोडणे, मातीकाम करणे, बांधकाम करणे हा पिढीजात व्यवसाय करीत आहे. राष्ट्राच्या व शहराच्या विकासामध्ये त्याचा समाजाने प्रत्येक धरणे, तलाव, विहीरी, किल्ले, मंदिरे, चर्च, मस्जिद त्याचबरोबर घरगुती संसारा उपयोगी पाटा, वरवंटा, खलबत्ते व मोठमोठे खोदकामे व बांधकामे या माध्यमातून आजतागायत राष्ट्रविकासात अग्रहक्काने भर घालण्यात आलेला आहे. तत्कालीन आघाडी सरकारने महाराष्ट्रातील वडार समाजाच्या खाणीवरील रॉयल्टीपौकी 200 ब्रास रॉयल्टी समाजाचे पारंपारीक व पिढीजात व्यवसाय म्हणून माफ करून सवलत दिलेली आहे.

असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी वडार समाजाच्या दगड खाणीवरील बंद काळातील रॉयल्टी माफ करून त्यांच्यावर रितसर कोणतीही दंडात्मक कारवाई होवू नये याकरीता महसूल मंत्री यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली. यावेळी लक्ष्मण विटकर, शंकर चौगूले, विष्णू मुदोळकर, बालाजी निंबाळकर, अनिल धोत्रे, शंकर बाबूराव चौगूले, राजू चौगूले, अरुण चौगूले, तुकाराम चौगूले, नवनाथ निंबाळकर, अप्पाराव विटेकर, अशोक भरले आदि. उपस्थित होते.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा काळा कायदा मागे घ्या : आडम मास्तर

0
नागरिकत्व दुरुस्ती कायदा
नागरिकत्व दुरुस्ती कायदा

सोलापूर (१९ डिसेंबर) – मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा काळा कायदा आणून देशाच्या संविधानाला नख लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. देशाच्या विविधतेला आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणारी बाब आहे. या कायद्यामुळे देशात अराजकता माजेल, भारतीय जनता हवालदिल होतील. हा कायदा मागे घ्या नाही तर जनता मोदी अमित शहा यांना धडा शिकवतील. असे मत आडम मास्तर यांनी व्यक्त केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्याची मागणी घेऊन माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शन करण्यात आले.

आदाम मास्टर म्हणाले की, संसदेच्या दोन्ही सदनांनी नागरिकत्व (संशोधन) विधेयक पारित केले आहे. भारतीय घटनेची पूर्णपणे पायमल्ली करणारे हे विधेयक भारतीय गणतंत्राचे धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वरूप नष्ट करण्याच्या उद्देशानेच आणले गेले आहे.

धर्मनिरपेक्षतेच्या पूर्णतः विरोधात जाऊन व्यक्तीचे नागरिकत्व त्याच्या धार्मिक संलग्नतेशी जोडणाऱ्या या विधेयकाला डाव्या पक्षांचा तीव्र विरोध आहे. देशाच्या एकता व अखंडतेला हानीकारक असलेल्या सांप्रदायिक विभाजनाची आणि सामाजिक ध्रुवीकरणाची तीव्रता अजूनच वाढवणे हे या विधेयकाचे उद्दीष्ट आहे. या विधेयकाच्या मंजुरी बरोबरच मोदी-शहा सरकारची नागरिकांच्या राष्ट्रीय नोंदणीचा विस्तार संपूर्ण देशात करण्याची घोषणा हे भारतीय गणतंत्राचे स्वरूप, धर्मनिरपेक्ष लोकशाहीकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकीय प्रकल्प असलेल्या “हिंदुत्व राष्ट्रात” बदलण्यासाठी उचललेले जुळे पाऊल आहे. डावे पक्ष देशभरातील आपल्या सर्व शाखांना आज नागरिकत्व संशोधन विधेयक व नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी या दोन्हींच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत आहोत.

आजच्या दिवशी भारतीय जनतेला सरफरोशी की तमन्ना गीताच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सामील होण्यासाठी प्रेरित करणाऱ्या राम प्रसाद बिस्मिल यांना गोरखपूर जेलमध्ये फासावर लटकवण्यात आले. त्यांचे सहआरोपी अश्फाक उल्ला खान यांना फैजाबाद जेलमध्ये तर अजून एक सहआरोपी रोशन सिंग यांना नैनी जेलमध्ये फाशी दिली गेली. धार्मिक संलग्नतेच्या पलिकडे घेऊन जाणाऱ्या या एकतेमुळेच भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. आरएसएस-भाजप आज ही एकता भंग करू पाहत असल्याचेही आडम यांनी म्हंटले आहे.

यावेळी माकपचे जिल्हा सचिव अँड एम एच शेख यांनी प्रास्तविक तर सूत्रसंचालन अनिल वासम यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर व्यंकटेश कोंगारी, सिध्दप्पा कलशेट्टी, युसूफ मेजर, रंगप्पा मरेड्डी, म हानिफ सातखेड, सुनंदा बल्ला, नलिनी कलबुर्गी, शेवंता देशमुख, सलीम मुल्ला, सलीम पटेल, लिंगव्वा सोलापूरे, दत्ता चव्हाण, शाम आडम, मल्लेशाम कारमपुरी, अशोक बल्ला, प्रशांत म्याकल, विक्रम कलबुर्गी, दाऊद शेख, नरेश दुगाने, अकिल शेख, बापू साबळे, विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, शिवा श्रीराम, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याळ आदी उपस्थित होते.

POPULAR POSTS