Current Affairs 03 September 2019 (चालू घडामोडी)

0
Current Affairs 03 September 2019
mahanews.co.in

Current Affairs 03 September 2019 | www.mahanews.co.in

मुंबई : गौर सारस्वत ब्राह्मण सेवा मंडळाने यावेळी 266.65 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे.

महाराष्ट्रात 2 सप्टेंबरपासून दहा दिवसीय गणेशोत्सव  सुरू होत आहे. देशातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळाच्या जीएसबी (गौर सारस्वत ब्राह्मण) सेवा मंडळाने यावेळी 266.65 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे 1.65 कोटी रुपये अधिक आहे. मंडळाकडे 2017 मध्ये 264.25 कोटी आणि 2018 मध्ये 265 कोटी रुपयांचा विमा होता.

मुंबई : लालबागच्या राजाचे 51 कोटींचे, जीएसबी वडाळानेही यावर्षी आपले विमा संरक्षण 50 कोटी रुपयांवरून 55 कोटी रुपये केले आहे. लालबागच्या राजाने गेल्या वर्षी 51 कोटी रुपयांचा विमा संरक्षण घेतला आणि यंदाही लालबागच्या गणपती मंडळाने याच रकमेचा आढावा घेतला आहे. मुंबईच्या किंग गणेश गल्लीसाठी मंडळाने यंदा 7 कोटींचा विमा उतरविला आहे. मागील वर्षीही  6 कोटी रुपयांचे कव्हर होते.

नवी मुंबईउरण येथील ओएसजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला भीषण आग लागली.

उरण येथील तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएसजीसी) गॅस प्रोसेसिंग प्लांटला लागली भीषण आग, 4 तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीत आतापर्यंत 5 जणांचा बळी गेला असून 4 जण जखमी आहेत.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार भडकले.

गरज पडली की बारामतीत यायचं. साहेबांचं कौतुक करायचं. सल्ला घ्यायचा आणि निवडणूक आली की विचारायचं पवार साहेबांनी काय केले? दोन्हीकडून वाजणाऱ्या ढोलासारखं राष्ट्रवादीच्या विरोधकांचं राजकारण सुरू आहे. पण आता बस्स झालं,’ असा संताप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

जळगाव : जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात 48 पैकी 38 आरोपींना नाशिक कारागृहात हलवले.

जळगाव घरकुल घोटाळा : 48 पैकी 38 आरोपींना धुळे कारागृहातून नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलं, यात सुरेश जैन, प्रदिप ग्यानचंद रायसोनी, चंद्रकांत बळीराम सोनवणे, जगन्नाथ नथ्थु वाणी या बड्या नेत्यांचाही समावेश आहे.

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात आज अमेरिकी बनावटीची आठ ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाली आहेत. वायुसेनाप्रमुख बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत आज पठाणकोटमध्ये या नव्या हेलिकॉप्टरचा लोकार्पण सोहळा पार पडला. अपाचे हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे वायुसेनेची ताकद वाढणार आहे. याच बरोबर ‘अपाचे’ हेलिकॉप्टरची वापर करणारा भारत हा 15 वा देश ठरला आहे.

मुंबई : ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात ‘सीएसएमटी६ूैु़’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातर्फे या ठिकाणाला ‘सर्वोत्कृष्ट स्वच्छ प्रेक्षणीय स्थळ’ पुरस्कारने गौरविण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : नवी दिल्लीत एन. अकबर रोड येथे ‘गरवी गुजरात’ हे भवन बांधण्यात आले, हे देशातील दुसरे  भवन आहे जे की  गुजरात सरकारने बांधले त्याचे क्षेत्रफळ 7000 चौरस मीटरपेक्षा जास्त  असेल, त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केले.

चंद्रयान -2 : चंद्रयान -2 चे विक्रम लाँडर ऑर्बिटरपासून यशस्वीरित्या वेगळा झाला आणि मिशन चंद्रयान -2 ने चंद्रा वर उतरण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेआहे.आणि चंद्रावर उतरण्याचा कालावधी 7 सप्टेंबर असेल.

दररोज चालू घडामोडी वाचण्यासाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here