Dinvishesh 07 November – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
dinvishesh 07 november
dinvishesh 07 november

Dinvishesh 07 November 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (Dinvishesh 07 November):

1665: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशीत झाले.

1875: वंदे मातरम हे गित बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले.

1879: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेपेची/काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली.

1917: पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.

1936: ’प्रभात’ चा ’संत तुकाराम’ हा चित्रपट पुण्यातील ’प्रभात’ चित्रपटगृहात रिलीज झाला.

1951: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे 2 रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

1990: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.

2001: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी ’सबीना’ (SABENA) दिवाळखोरीत गेली.

जन्मदिन:

1858: ’लाल-बाल-पाल’ या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म. (मृत्यू: 20 मे 1932).

1867: नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ मेरी क्यूरी यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1934).

1868: व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म. (मृत्यू: 30 एप्रिल 1913).

1879: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचा जन्म. (मृत्यू: 21 ऑगस्ट 1940).

1884: क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1967).

1888: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा जन्म. (मृत्यू: 21 नोव्हेंबर 1970).

1900: स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ ’एन. जी. रंगा’ यांचा जन्म. (मृत्यू: 9 जून 1995)

1915: महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन धनराज पारिख यांचा जन्म.

1954: अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक कमल हासन यांचा जन्म.

स्मृतिदिन:

1562: मारवाड़चे राव मालदेव राठोड यांचे निधन. (जन्म: 5 डिसेंबर 1511).

1862: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचे निधन. (जन्म: 24 आक्टोबर 1775)

1905: कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ यांचे निधन. मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे 135 कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही.

’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. (जन्म: 7 आक्टोबर 1866)

1963: यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी यांचे निधन. मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: 17 डिसेंबर 1901)

1980: हॉलिवूड अभिनेता स्टीव्ह मॅकक्‍वीन यांचे निधन. (जन्म: 24 मार्च 1930).

1981: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचे निधन. (जन्म: 5 नोव्हेंबर 1885).

1998: शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पं. जितेंद्र अभिषेकी यांचे निधन. (जन्म: 21 सप्टेंबर 1929).

2000: गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. सुब्रम्हण्यम यांचे निधन. (जन्म: 30 जानेवारी 1910).

2009: लेखिका व स्वातंत्र्यसैनिक सुनीता देशपांडे यांचे निधन. (जन्म: 3 जुलै 1926).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here