Dinvishesh 10 November – प्रमुख घटना, जन्म आणि मृत्यु

0
dinvishesh 10 november
dinvishesh 10 november

Dinvishesh 10 November 2019 by MahaNews – इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या घटनांची सविस्तर माहिती.

प्रमुख घटना (Dinvishesh 10 November):

1659 : शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे अफझलखानाचा वध केला. व प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाची समाधी बांधण्याचे आदेश दिले.

1698 : ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले.

1958 : गुजरातमध्ये बडोद्याजवळ वेदसार येथे प्रायोगिक विहिरीमध्ये तेल सापडले.

1960 : नागविदर्भ चळवळीच्या आदेशावरून नागपुरात हरताळ, घाऊक व्यापार, दुकाने, हॉटेले बंद.

1983 : बिल गेट्स यांनी विंडोज 1.0 प्रकाशित केले.

1990 : भारताचे 8 वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली.

1999 : शास्त्रीय संगीतातील बहुमोल कामगिरीबद्दल मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’तानसेन सन्मान’ गायक पं. सी. आर. व्यास यांना जाहीर.

2001 : ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ आणि आणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर चिदंबरम यांची केन्द्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून निवड.

2006 : तामिळ वंशाचे श्रीलंकेतील संसद सदस्य नादराजा रविराज यांची कोलंबो येथे हत्या.

जन्मदिन:

1810 : फ्लश शौचालय चे निर्माते जॉर्ज जेनिंग्स यांचा जन्म. (मृत्यू: 17 एप्रिल 1882).

1848 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि त्यातील जहाल गटाचे नेते, ’राष्ट्रगुरू’ सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: 6 ऑगस्ट 1925).

1851 : प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी मूलभूत संशोधन करणारे ब्रिटीश निसर्ग शास्त्रज्ञ फ्रान्सिस बाल्फोर यांचा जन्म. (मृत्यू: 6 जुलै 1882).

1904 : साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील 43 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कुसुमावती आत्माराम देशपांडे  यांचा जन्म. (मृत्यू: 17 नोव्हेंबर 1961).

1919 : एके 47 बंदुकीचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2013).

1925: अभिनेता रिचर्ड बर्टन यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1984).

1944 : किर्गिस्तान देशाचे पहिले अध्यक्ष असगर अकयेव यांचा जन्म.

1952 : सुप्रसिद्ध लेखिका  सुनंदा बलरामन् उर्फ सानिया यांचा जन्म.

1964 : हिंदी चित्रपट अभिनेते आशुतोष राणा यांचा जन्म.

मृत्यूदिन:

1659 : विजापूरचे सरदार अफजलखान यांचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.

1920 : स्वदेशी जागरण मंच, भारतीय मजदूर संघ व भारतीय कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचे निधन. (जन्म: 14 ऑक्टोबर 2004).

1922 : शिवकालीन जंत्रीचे कर्ते, गणितज्ञ व ज्योतिर्विद गणेश सखाराम खरे यांचे पुणे येथे निधन.

1938 : तुर्कस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष मुस्तफा कमाल अतातुर्क यांचे निधन. (जन्म: 19 मे 1881).

1941 : संतसाहित्याचे अभ्यासक, चरित्रकार व गाथा संपादक लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचे निधन. (जन्म: 31 जुलै 1972).

1982 : रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस लिओनिद ब्रेझनेव्ह यांचे निधन. (जन्म: 19 डिसेंबर 1906).

1996 : शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका माणिक वर्मा यांचे निधन. ’वंदे मातरम’, ’सीता स्वयंवर’, ’मायाबाजार’, ’गुळाचा गणपती’, ’पुढचं पाऊल’ या चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले. ’वाजई पावा गोविंद’, ’त्या चित्तचोरट्याला’, ’अमृताहुनी गोड’ इ. त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत. (16 मे 1926).

2003 : झिम्बाब्वे देशाचे पहिले अध्यक्ष कन्नान बनान यांचे निधन. (जन्म: 5 मार्च 1936).

2009 : अभिनेत्री सिंपल कपाडिया यांचे निधन.(जन्म: 15 ऑगस्ट 1958).

2013 : भारतीय लेखक विजयदन देठा यांचे निधन. (जन्म: 1 सप्टेंबर 1926).

नियमित दिनविशेष वाचण्यासाठी MahaNews संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here