(Highest Paying Jobs) भारतात सर्वात जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्या

भारतात कोणत्या क्षेत्रात नोकरी केल्यावर अधिक मानधन प्राप्त होते याबाबदल सविस्तर माहिती सांगितली आहे.

0
highest paying jobs in India
highest paying jobs in India

Highest Paying Jobs in India – सर्वसामान्य लोकांच्या गरजा खूपच जास्त असतात. व त्याला मिळणाऱ्या वेतनात तो समाधानी राहण्याचा प्रयत्न करत असतो. नोकरी करणारी प्रत्येक व्यक्ती वेतनात वाढ होण्यासाठी धडपड करत असते. तुम्हाला चांगल्या पगाराची अपेक्षा असेल.

आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. श्रीमंतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यासाठी तुम्हाला त्यांच्या पोटी जन्म घेऊन यावे लागेल, मात्र प्रत्येकजण श्रीमंत घरात जन्माला येत नाही. नाहीतर कष्ट करुन श्रीमंती मिळवावी लागते. बहुतांश सर्वानाच श्रीमंत होण्यासाठी कष्ट करूनच पैसा कमवावा लागतो.

जास्त पगाराची नोकरी मिळविणे हे खऱ्या अर्थाने आव्हान आहे. त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक ज्ञानाबरोबरच इतरही अनेक कौशल्यं येणे गरजेचे असते. त्यासाठी शॉर्टकट नसतो, त्यामुळे भारतात कोणते क्षेत्र निवडल्यास तुम्हाला सर्वाधिक पगार मिळेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

1. युनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC) सरकारी नोकरी:

यात I.A.S , I.P.S , I.F.S यांचा समावेश होता. हा आपल्या देशातली सर्वात मोठी पदाची आणि महत्वपूर्ण नोकरी आहे.तसेच यात जबाबदारी पण तेवढीच महत्वाची आहे.

दरवर्षी खूप विद्यार्थी यासाठी परीक्षा देतात पण यातिल खूप कमी विद्यार्थी परीक्षेत पास होतात. हि खूप अवघड परीक्षा असते. पण ही नोकरी खुप प्रतिष्ठेची मानसी जाते.

तसेच सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये काम करणार्यांना घर, गाडी, ड्रॉयव्हर, अनुदानित वीज या सारख्या अनेक गोष्टी मिळत असतात. या व्यतिरिक्त विदेशामध्ये जाऊन पुढचा अभ्यासासाठी सुट्टी देखील मिळते.

पगार : 2 लाख प्रति महिना.

2. सुरक्षा सेवा (Defense Services):

डिफेन्स सर्विसेस मध्ये आर्मी, नेव्ही एअरफोर्स हे सगळे येतात. हे एक सन्मान जनक काम आहे. डिफेन्स सर्विसेस साठी वेगवेगळ्या परीक्षा असतात.

जसे कि ACC, NDA, SCO, CDS, SSB यासारख्या अजून काही परीक्षा पण असतात. इथे पगार पण जास्त असतो. हे खरे तुमच्या स्वतःवर अवलुंबन असते. वेळेनुसार सरकार मासिक पगारात पण वाढ पण होत असते.

सुरूवात : 1 लाख प्रति महिना. आणि जसजसे प्रमोशन घेत जाईल तसा वाढत जातो आणि वेगवेगळे Allowance पण मिळतो.

3. चार्टर्ड अकाऊंटंट (Chartered Accountant):

चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ची एक क्रेझ आहे. सीए हा एक उत्तम करियर पर्याय आहे. चार्टर्ड अकाऊंटंटची बिझनेस आणि अकाऊंट संबंधित विषयावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. या फिल्डमध्ये तुमच्याकडे शिक्षणाशिवाय इतरही कौशल्यं असणे गरजेचे आहे. भारतातील आदर दिल्या जाणाऱ्या फिल्डपैकी ही एक उत्तम फिल्ड आहे.

सुरुवात – 4-5 लाख, करिअरच्या मध्यावर – 08 ते 10 लाख, शेवटच्या अनुभवी टप्प्यात – 20 ते 25 लाख.

4. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (Highest Paying Jobs):

समजा तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर आवडत नसेल तर तुमच्य साठी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (PSU) मध्ये सरकारी नोकरी चा पर्याय उत्तम राहील.

पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (PSU) मध्ये सरकारच्या मोठमोठ्या कंपन्या जस कि BHEL, ONGC, IOCL, BARC, NPCIL असतात. यामध्ये कामकारण्यासाठी GATE ची परीक्षा द्यावी लागते. इथे या कंपनी मध्ये काम करताना शिफ्ट चालते.

पगार: 70,000 ते 1 लाख प्रति महिना. आणि शिफ्टचा वेगळा Allowance, यावेतिरिक्त खाण्या पिण्यासाठी कॅन्टीन मध्ये सबसिडी , लॅपटॉप , फर्निचर, पेट्रोल Allowance पण मिळतो.

5. विद्यापीठ प्राध्यापक (University Professor):

शिक्षकांचे काम हे सगळ्यात चांगले, विना कटकटीचे व शांतीचे आहे. यासाठी प्रोफेसर ची नोकरी ती पण गव्हर्मेंट कॉलेज मध्ये चांगली असते. आणि तुम्हाला मान पण खुप मिळतो. मासिक वेतन वेगवेगळ्या गोष्टीवर कमी जास्त ठरत असते . समजा तुम्ही NIT , IIT चे प्रोफेसर असाल तर तुमचा पगार जास्त असतो. समजा तुम्ही PHD केलेली आहे तर इतर प्रोफेसर पेक्षा अधिक पगार असतो . 

पगार: 1 ते 1.50 लाख पर्यंत असते. यावेतिरिक्त तुम्हाला मेडिकल, House Allowance पण मिळतो.

6. बँकिंग (Banking):

जेव्हा बँकिंग विषयी बोलले जाते तेव्हा RBI , GOVERNER, PROBATIONARY OFFICER ( PO) हे सगळे नाव आठवतात. बँकिंग मध्ये या पोस्ट साठी सगळेच प्रयत्न करतात. बँके मध्ये प्रोमोशन मिळणे सोपे जाते. तुम्ही जर बँकेचे कर्मचारी असाल तर लोन सहज रित्या आणि कमिव्याजात मिळते.

highest paying jobs information in marathi
highest paying jobs information in marathi

पगार: 18 लाख प्रति वर्ष देते. याव्यतिरिक्त दरवर्षी बाहेर फिरण्यासाठी 1 लाख रुपये, मुलांच्या शिक्षणाचा Allowance आणि अजून भरपूर काही देते.

7. तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र:

या क्षेत्रात अतिशय मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. या क्षेत्रातील प्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे विभाग म्हणजे भूगर्भशास्त्रज्ञ, मरीन इंजिनिअर्स आदी.

अनुभवी – 15 ते 20 लाख.

8. वैज्ञानिक (Scientist):

जर तुम्हाला वैज्ञानिक बनायचे असेल तर तुम्ही ISRO , DRDO साठी प्रयत्न करावा. अशा ठिकाणी तुम्हाला मनासारख्या कामासोबत/रिसर्च सोबत पैसा देखील चांगला मिळतो. इथे बेसिक पगार ४०,००० पासून ६०,००० पर्यंत असतो. हे आपल्या कामानुसार वाढत जाते.

पगार: 1 ते 1.50 लाखापर्यंत जातो. यावेतिरिक्त तुम्हाला 10 ते 12 हजार रुपये प्रवास खर्च, कॅन्टीन मध्ये मोफत जेवण, राहण्यासाठी घर, प्रत्येक सहा महिन्याला बोनस पण मिळतो.

9. सरकारी डॉक्टर (Government Doctor):

सरकारी डॉक्टरची मागणी तर नेहमीच असते. कारण सरकारी दवाखान्यात उपाय हा कमी खर्चात  किंवा स्वस्तात होत असतो. पण सरकारी डॉक्टरांचा पगार हा इतर नोकरी पेक्षा जास्त असतो.

MBBS नंतर तुम्ही कोणत्या हाँस्पीटल मध्ये व कोठे नोकरी करतात यावर तुमचा पगार ठरत असतो. आजकाल सरकार 25% पासून 50% पर्यंत जास्त पगार गावागावात जाऊन लोकांची सेवा करतात त्या डाँक्टरांना देतात.

पगार: सर्जनला 1.50 ते 2 लाख प्रति महिना पर्यंत. व ज्युनिअर डॉक्टर ला 50 ते 80 हजार प्रति महिना.

10. मिळकत कर अधिकारी (Income Tax Officer):

आयकर विभागात नोकरी साठी सर्वजण प्रयत्न करतात. यामध्ये पैश्या सोबत मान पण खूप जास्त असतो. इथे तुम्ही इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर ने सुरवात करून कंमिशनर पर्यंत पोहचू शकता.

आयकर विभागात नोकरी करण्यासाठी तुम्हाला SSC-CGL यासारखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्ही डायरेक्ट असिस्टंट कंमिश्नर च्या खुर्चीवर बसू शकता.

पगार: 1 लाख प्रति महिना. यावेतिरिक्त तुम्हाला सरकारी गाडी, सिम कार्ड  आणि वेगवेगळे Allowance हे सगळे दिले जाते.

अश्याच चांगल्या माहितीसाठी आणि मराठी लेखांसाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here