मतदान का करावे? आमदार, खासदार आपण का निवडून देतो?

मतदान हा अधिकार आणि त्याचे महत्व या लेखामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपण निवडलेले आमदार आणि खासदार यांचावर कोणती जबाबदारी असते हे सविस्तर सांगितले आहे.

1
मतदान, Voting importance
Marathi Lekh by MahaNews

आपल्या देशात लोकशाही शासन चालू आहे. लोकशाहीनत प्रत्येकाला किंवा सर्वानाच मतदानाचा अधिकार दिला आहे. त्याच बरोबर या अधिकाराचा वापर योग्य त्या पद्धतीने कसा करायचा, याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची किंवा प्रत्येक मतदाराची आहे. आणि प्रत्येकाने चांगला उमेदवार निवडने गरजेचे आहे. त्यामुळे पैसे न घेता किंवा कोणत्याही अमिषाला बळी न पडता, आपल्या चांगल्या विचाराचा आणि योग्य त्या उमेदवाराला मत देणे ही मतदाराची जबाबदारी आहे.

आत्ता 21 ऑक्टोबर 2019 रोजी महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणूकीमध्ये विविध पक्षाचे उमेदवार, पक्ष संघटना, या मान्यवरांनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आणि काही उमेदवारांनी तर मतदान का करावे या विषयी अनेक मुद्दे मांडण्यात आले आणि अनेक अमिषा देण्यात येतात जसे की निवडून आल्यानंतर आम्ही जेवन देऊ, नोकरी देऊ, कर्ज माफ करू वैगेरे वैगेरे अशा वेगवेगळ्या अमिशांना बळी न पडता योग्य तो उमेदवार निवडने गरजेचे आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्याची जिम्मेदारी हि Election Commision ची असते.

मतदान का करावे?

कोणाला निवडणू आणायचे हे आपल्या हातात असते. परंतू अशा वेळी काही लोक मतदान न करणारे लोक का मतदान करत नाहीत हेच विसरून जातात. आणि काही लोक मतदान का करत नाहीत हे विसरून जातात आणि या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न ही कोणिच करत नाही.  

आपले पुढचे पाच वर्षांचे आयुष्य कसे असावे हे आपल्या मतदानाने ठरवता येते कारण आपल्या देशाचा कारभार पाहणारे कारभारी आपण मतदानातून निवडून देत असतो. मतदानाच्या अधिकाराचा अर्थ नीट समजून घेण्याची गरज आहे.

भारताची लोकशाही ही लोकांनी चालवलेली राज्यकारभार आहे. पण देशातला प्रत्येक नागरीक लोकसभेत जाऊन राज्य कारभारावर चर्चा करू शकत नाही, म्हणून मतदाराने आपला प्रतिनिधी निवडून लोकसभेत/विधानसभेत जावून, सर्व लोकांच्या मार्फत देशाचा कारभार पहावा अशी अपेक्षा असते.

हे प्रतिनिधी जेवढे चांगले असतील तेवढा देशाचा/राज्याचा कारभार चांगला होईल आणि लोकांच्या हिताचा होईल. मात्र याबाबतीत प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपले मत व्यक्त केले पाहिजे. जे लोक मतदान करणार नाहीत ते देशाच्या कारभाराच्या बाबतीत उदासीन किंवा नाराज आहेत असे म्हणावे लागेल. ही उदासीनता झटकून प्रत्येकाने आवर्जून मतदान केले पाहिजे.

मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य:

आपले मत कोणालाही असो किंवा आपल्या मतदारसंघात उभ्या असलेल्या एकालाही नसो पण आपण कर्तव्य म्हणून मतदान केले पाहिजे कारण ते आपले कर्तव्य आहे. ते कर्तव्य लोकशाहीप्रती, देशाप्रती किंवा कोणत्या पक्षाप्रती नसते तर ते आपल्याप्रती असते, आपल्या हितासाठी असते. ही जाणीव ठेवून आवर्जुन मतदान केले पाहिजे.

मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे, आणि त्या अधिकाराचा योग्य तो वापर करून मतदानाची जबाबदारी पाड पाडली पाहिजे. त्यामुळे मतदान करताना पैसे न घेता किंवा कोणत्याही अमिषाला बळी न पडता योग्य त्या उमेदवाराला मतदान करून निवडून द्यायचे.

मतदार म्हणून उमेदवाराला मत देण्यापूर्वी, त्याच्या कामगिरी त्याने काय कामे केलीत याचा आढावा करने आवश्यक आहे. याआधी आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने गेल्या पाच वर्षांत लोकसभेत किंवा विधानसभेत किती आणि कोणत्या विषयांवर प्रश्न विचारून त्यांचे निराकरण केले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत की नाहीत? हे जाणून घेणे आवश्यक आहे.

लोकांच्या उपयोगाच्या व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे का? किती नागरीकांना कामाला लावले आहे का? पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज पुरवठा, सरकारी हाँस्पीटल, रस्ते चांगले आहेत का?, वाहनसाधने  या अत्यंत गरजेच्या सोयी पुरविल्या आहेत का? या प्रश्नांचा मागोवा घेणे अत्यंत आवश्यक आहे.

मागोवा घेत असताना या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशी आल्यास, परत त्याच उमेदवाराला तुम्ही मत देणार आहात का? हा प्रश्न स्वत:लाच विचारायला हवा. नुसत्या भेटीगाठी, आश्वासनाने, आणि आर्थिक मदतीचे अमिष देणाऱ्यांनाच पुन्हा मत द्यायचे का? हे प्रश्न प्रत्येकाने स्वत:लाच विचारून त्याची उत्तरे शोधायला हवीत.

सोमवार, 21 ऑक्टोबर 2019 रोजी, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. अर्थातच, तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्यासाठी नक्कीच जाणार. या सोबतच तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याची कामं योग्य पद्धतीनं करतोय की नाही, यावर लक्ष ठेवणं. हे देखील सर्वांची जबाबदारी आहे. 

गटारं बांधणं, शौचालय नुतनीकरण, मंदीराचे शेड बांधणं ही कामे आमदारांची नाहीत. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असतात. आपण नगरसेवकांची, ग्रामसेवकांची याच कामांसाठी निवड करत असतो. मग, आपण आमदाराला कशासाठी निवडून देतो. त्यांची सैविधानिक कामं काय असतात. हेदेखील आपल्याला माहीत असायला हवं. Voter ID List 2019 मध्ये आपले नाव आहे का नाही याची पडताळणी ऑनलाईन करून घ्यावीत.

मतदान, Voting importance
Maharashtra Vidhan Sabha Elections

आमदारांना आपण का निवडून देतो?

कायदे बनविणे: भारतीय घटनेचे 246 कलमानुसार आमदाराचं मुख्य काम आहे ते म्हणेज राज्यात सुव्यवस्था राखण्यासाठी कायदे बनविणे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये बदल करणे. काळ आणि परिस्थितीला एखादा कायदा नुकसानकारक ठरत असेल तर असे कायदे रद्द करूणे गरजेचे आहे.

घटनेत दुरुस्तीचा अधिकार: घटनेत काही दुरुस्त्याीच्या वेळी किमान निम्म्या आमदारांच्या संमतीची गरज असते. त्या वेळी मतदान करून योग्य उमेदवार निवडणे हे आमदारांचे काम असते.

यापैकी किती कायद्यांवरील चर्चेत आपल्या आमदाराने सहभाग घेतला होता? कोणत्या कायद्यावरील चर्चेत भाग घेऊन एखादी तरी दुरुस्ती संबंधित कायद्यात करायला सरकारला भाग पाडले? किती आणि कोणत्या क्षेत्राशी संबंधित कायद्यासाठी आमदाराने अशासकीय विधेयक विधिमंडळाच्या पटलावर मांडले?

आर्थिक नियंत्रण: राज्याच्या आर्थिक स्थितीवर नियंत्रण ठेवणे, हेही आमदारांचे महत्त्वाचे काम आहे. राज्याचे अर्थिक विषयक धोरण ठरताना, नवे कर लावताना, काही कर रद्द करताना, विविध करांची आणि त्यांच्या दरांची रचना करताना आमदारांनी धोरणात्मक चर्चा केली पाहिजे आणि निर्णयप्रक्रियेत भाग घेतला पाहिजे. जर, अर्थसंकल्पावर काही आक्षेप असेल तर त्यानं यासंबंधी आपलं मत विधिमंडळात मांडलं की नाही?

प्रतिनिधींची निवड करणे: आमदारांना आवश्यक त्या वेळी विधान परिषदेसाठी प्रतिनिधी निवडणे, योग्य वेळी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची निवड करणे ही कामेदेखील करावी लागतात. ती कामे त्यांनी प्रामाणिकपणे करावे हेच अपेक्षीत असते.

खासदारांना आपण का निवडून देतो?

केंद्र पातळीवर धोरण ठरवणे व त्या धोरणाच्या अम्मलबजावनीचा पाठपुरावा करणे हे खासदाराचे काम आहे. लोकसभेतील खासदार राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार असतो. या निवडणुकीत विचार पुर्वक मत करणे हे खासदाराचे कर्तव्य आहे.

याव्यतिरिक्त सभागृहात होणाऱ्या चर्चा मध्ये सहभागी होणे, अधिवेशन चालू असताना सरकार च्या कार्याबाबत, भूमिकेबाबत प्रश्न विचारने, माहिती मांडले व त्यावर आपले मत मांडने व आपल्या मतदार संघातील लोकांच्या आशा अपेक्षा सरकार पर्यंत पोहचवणे हेही खासदाराचे चे काम आहे.

खासदार निधीचा वापर कशाप्रकारे व्हावा या निधीद्वारे कोणती कामे व्हायला हवित हे ठरविण्यासाठी आपल्या मतदार संघात बैठका घेऊन लोकांची मते जाणून घेतली पाहिजेत.

अश्याच चांगल्या माहितीसाठी आणि मराठी लेखांसाठी महान्यूज संकेतस्थळाला भेट देत राहा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here