सन 2019 चा सातारा भूषण पुरस्कार काटकर बंधुना प्रदान

0
quick heal technologies
quick heal technologies

सातारा : आज जगात सर्वच क्षेत्रात वाढत असलेले सुरक्षिततेचे धोके लक्षात घेउन जगातील संगणक आणि विविध गॅझेटसना व्हायरस मुक्त करणारे काटकर बंधु हे अतिशय मोठे काम करत आहेत काम करताना नवनवीन कल्पना सुचणे हाच मोठा विजय आहे, असे उदगार शिवसेना नेत व वक्ते प्रा. नितिन बानुगडे पाटेल यांनी काढले.

येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिक यांच्यातर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा मानाचा सातारा भूषण पुरस्कार 2019 सालासाठी आज 25 वर्षे आयटी सिक्युरिटी क्षेत्रात आपल्या क्विक हील या देश परदेशात नामांकित असलेल्या कंपनी द्वारे करोडो नागरिक व कंपन्यांना अत्त्युत्तम सेवा देणार्या संस्थेचे संस्थापक डॉ कैलाश व डॉ संजय काटकर या बंधुना प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्सच्या सभागृहात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व प्रेरणादायी लोकिप्रिय वक्ते प्रा.नितीन बानुगडे पाटील यांचे अध्यक्षतेखाली व गोडबोले ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गोडबोले ,विश्वस्त अशोक गोडबोले व डॉ. अच्युत गोडबोले यांचे प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना नितीन बानुगडे पाटील यांनी वरील उद्गार काढले.

कार्यंक़्रमाची सुरुवात ट्रस्टचे वतीने सर्वं मान्यवरांचे सत्काराने झाल्यावर आपल्या प्रास्ताविकात डॉ. अच्युत गोडबोले यांनी रा.ना. गोडबोले ट्रस्ट चे वतीने करण्यात आलेल्या आजवरील उपक्रमाची माहिती दिली.

सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील ललगुण या छोट्या गावातील आणि रहिमतपूरला जन्मलेले शेतकरी कुटुंबातील हे दोघे सुपुत्र. अफाट जिद्दीने त्यांनी आपले प्रोडक्ट तयार करून 1995 साली त्याच्या मार्केटिंग ला प्रारंभ केला.सर्वोच्च दर्जा, उत्तम ,स्नेहपूर्ण आणि त्वरित सेवा ही त्रिसूत्री सदैव जप्त गेल्याने ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत गेला.तेव्हापासून आजतागायत कंपनीची घोडदौड वेगाने चालू आहे. आज आपला उत्तम कार्यशैलीचा 1200 हून जास्त स्टाफ, भारतातभर पसरलेल्या अनेक शाखा ,शिवाय अमेरिका , दुबई,जपान , आफ्रिका या देशातील शाखा व तद्न्य अभियंते यांच्या माध्यमातून क्विक हील टेक्नोलोजी अक्षरशः कोटयवधी ग्राहकांची आणि म्मोथ मोठ्या कंपन्यांची तत्पर सेवा करीत आहे. सतत नवनवीन संशोधन करून अद्ययावत उत्पादने निर्माण करून जागतिक स्पर्धेला सक्षम तोंड देत कंपनीने आपले अग्रस्थान जागतिक पातळीवरही कायम राखले आहे.

या दोन्हो बंधूंना या त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले असून शिवाय दोघांनाही दोन विद्यापीठांनी मानद विद्या वाचस्पती नेही गौरविले आहे, आपल्यापैकी हजारो लोक क्विक हील रोज वापरतात पण त्याचे जनक आपल्या सातारा जिल्ह्यातीलच हे दोघे काटकर बंधू आहेत हे आपणास माहितही नसते.त्यांची ही जिद्द, उद्यम शिलता तरुणांना व नव उद्यामिना निश्चित प्रेरणादायी ठरणारी आहे.म्हणूनच हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करत आहोत. यावर्षी ज्येष्ठ संशोधक डॉ दत्तप्रसाद दाभोलकर,पत्रकार विजय मांडकेआणि ट्रस्ट चे विश्वस्त अशोक, डॉ अच्युत व उदयन गोडबोले यांच्या निवड समितीने हि निवड केली आहे. अशी माहिती यावेळी अरुण गोडबोले यांनी आपल्या मनोगतात दिली.

डॅा.अनील पाटील यांनी आपल्या भाषणात गोडबोले कुटुंबिय हे सातार्‍यातून चांगली संकल्पना मांडून ती पुर्णत्वाला नेतात, विविध क्षेत्रातील ही रत्ने शोधुन ती आपणा पुढे आणतात याचे कौतुक वाटते. आज सर्वच जगापुढे पुढील पाच वर्षात मानवी हाताला काम रहाणार नाही. सर्वच ठिकाणी 70 टक्के काम रोबो, ड्रोन चे माध्यमातून नोकर्‍या कमी होणार आहेत. उद्या काय हेच आजच्या जगण्याचे विषय असून नवीन स्किल वापरुन कसे टिकायचे हे ज्याने त्याने ठरवावे लागेल. बदल लवकर घडवले तरच टिकु शकाल आज काटकर बंधुनी नवीन सुरक्षा कवच क्विकहीलचे द्वारा आणून नवीन पिढीची जबाबदारी घेतली याचे कोैतुक वाटतेअसे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात नितिन बानुगडे पाटील यांनी चीन मधील अलीबाबा डॉटकॉमचे उदाहरण उपस्थितांना देत रहिमतपुरचे नाव मोठे केल्याबद्दल कौतुक केले. व नव्या उद्योजकांना त्यांचे कार्यं प्ररेणा देईल,बळ देईल असे सांगिेतले. रु. 30 हजार,रामनामी शाल व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हा पुरस्कार डॉ.अनील पाटील यांनी या दोन बंधुना प्रदान केला.तसेच यावेळी रविंद्र झुटींग यांनी अतिशय कलात्मक अशीही दोन्ही सन्मान पत्रे तयार केली आहेत म्हणून त्यांचा ही सत्कार करण्यात आला.तसेच सौे.छाया काटकर यांचा सत्कार सौ.अनुपमा गोडबोले यांनी केला.

सत्काराला उत्तर देताना डॉ.कैलास काटकर म्हणाले की, सातारमध्ये मा या कामाला मान्यता मिळत आहे त्याचा मला आनंद आहे. सायबर सिक्युरिटी महत्वाची आहे. वडील फिलिप्सला मशिनीस्ट होते. वडील आईला इंग्रजी येत नव्हते . वडिलांनी कष्ट भरपूर घेतले. चाळीत रहात होते. स्क्रीन पेंटिंग शिक्षण घेताना सुरु केले. रेडिओ रिपेरिंग , मोबाईल दुरुस्ती , कॅलकुलेटर दुरुस्ती काम सुरू केले. बुककिपींग शिकलो. केल्या एका कंपनीमध्ये हे काम केले. हरकाम्या म्हणून काम केले. माझे वर्कशॉप सुरू केले. कंम्प्युटर म्हणजे काय हे विचारले ? ते शिकलो. दुरुस्ती काम सुरू केले. 95 साली अँन्टीव्हायरस संजय काटकर यांनी बाहेर आणले. पुणे,नाशिक,नागपूर ,इंदुर अशा 26 ठिकाणी शाखा सुरू केल्या. कंपनीच्या जपान,दुबई 40 देशात डिस्ट्रिब्युटर आहेत. अडचणीवर मात करणे शिकलो. सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी बँकांनी प्रथम काहीही मदत केली नाही. अमेरिकन कंपनीने आमच्या कंपनीत पैसे गुंतवले. 2016 साली कंपनी जगात लिस्टेड झाली. कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. अजून भरपूर काही करायचे आहे. सायबर सिक्युरिटी महत्वाची आहे. सायबर सिक्युरिटी चा स्कोप मोठा आहे असे अनेक प्रसंग सांगुन आपला जिवनपट उलगडून दाखवला.

तर डॉ. संजय काटकरयांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमच्या लोकांसमोर,कुटुंबियांसमोर असा सत्कार होणे आम्ही महत्त्वाचे मानतो. अनेक पुरस्कार मिळाले पण हा सातारा भुषण पुरस्कार आमच्यादृष्टीने महत्वाचा आहे. तिन वर्षे काम करून , संशोधन करून व्हायरस शोधण्याचे काम पुढे आणले. व्हिजन ठेवणे महत्वाचे . स्वतःला सिध्द करावे लागेल. हेच महत्वाचे आहेअसे सांगितले.

समारंभाचे सुत्रसंचालन प्रदयुम्न गोडबोले यांनी तर आभार प्रदर्शन अरुण गाडेबोले यांनी केले. या कार्यक्रमास डॅा.दत्तप्रसाद दाभोलकर, पी. एन. जेाशी,डॉ. कानडे, श्रीकांत जोशी,डॉ. रविंद्र हर्षे, नंदकिशोर नावंधर, प्रघ. अविनाश लेवे,अशोक गोडबोले,डॉ.अच्युत गोडबोले,उदयन गोडबोले,प्रद्युम्न गोडबोले, डॉ. चैतन्य गोडबोले, डॉ. सौ. अनुराधा गोडबोले,संजीवनी गोडबोले,प्रियंवदा गोडबोले , गौंतम भोसले, जयवंत चव्हाण, वासुदेव कुलकर्णी यांचेसह संपूर्ण जिल्ह्यातुन अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here