लग्न लावत नाही म्हणून मुलाने केली आईची हत्या

0
vaduj murder

खटाव तालुक्यातील मोराळे येथील धक्कादायक घटना : मुलाला पोलिसांनी घेतले ताब्यात

माझ्या पेक्षा लहान मुलांची लग्न झाली पण माझ लग्न का करत नाही असं म्हणत मुलाने चक्क आपल्या जन्मदात्या आईला कुराडीने डोक्यात घाव घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना खटाव तालुक्यातील मोराळे या गावात घडली आहे. याबाबत वडूज पोलिसांनी मुलगा किरण शहाजी शिंदे (वय २८) याला ताब्यात घेतले आहे.

बुधवार दिनांक ११ रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपी किरण शिंदे याने आपल्या राहत्या घरात माझ्या मागच्या मुलांची लग्ने झाली आहेत पण माझं लग्न का करत नाही असं म्हणत घराला आतून कडी लावली तर आपल्या आईला ( कांताबाई शहाजी शिंदे, वय ५५) यांना शिवीगाळ करीत डोक्यात कुराडीने डोक्यात घाव घालीत निर्घृण खून केला. तर फिर्यादी यांना तुम्ही घराचा दरवाजा तोडून आत आल्यास तुमचा खून करेन अशी धमकी दिली. याबाबत आरोपीचे वडील शहाजी बाबुराव शिंदे यांनी वडूज पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. घटनेचे गंभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन आरोपी किरण शिंदे याला ताब्यात घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here