आता बस महामंडळ मध्ये मोफत प्रवास करा, फक्त हे कार्ड काढा !|Free ST Bus Service

MAHA NEWS

Free ST Bus Service

Free ST Bus Service 2023: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे, आज आपण बस महामंडळ मध्ये मोफत प्रवास करण्यासाठी कोणते कार्ड काढावे याबद्दल जाणून घेणार आहोत. राज्यातील 29 समाज घटकांना बस महामंडळाकडून प्रवास भाड्यांमध्ये मोठी सवलत देण्यात येते. यामध्ये दिव्यांग, प्रज्ञाचक्षू, विविध राज्य शासनाचे पुरस्कारप्राप्त नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर विविध राज्य प्रकारच्या 29 समाज घटकांतील प्रवासांना सवलत देण्यात येते. स्मार्ट कार्ड नोंदणी करून या सवलतीचा लाभ घेणे सक्तीची करण्यात आलेली आहे.

Free ST Bus Service

राज्य परिवहन महामंडळाने देऊ केलेल्या सवलतीच्या दरात प्रवाशांना त्यांचा वापर करता यावा यासाठी स्मार्ट कार्ड मिळविण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. स्मार्ट कार्ड मिळविण्याची मूळ अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2022 होती. मुदत वाढवल्याने प्रवाशांना फायदा झाला आहे जे आता राज्याद्वारे ऑफर केलेल्या प्रवास सवलतींचा लाभ घेऊ शकतात.

स्मार्ट कार्ड कसे काढायचे | How to Remove Smart Card

स्मार्ट कार्डसाठी पात्र नागरिकांना त्यांच्या जवळच्या आगार कार्यालयात भेट देण्याची आवश्यकता असते. तुम्हाला आपल्या आधारकार्ड / मतदानकार्ड असणे आवश्यक आहे. आपण ओळखीचा पुरावा पण त्यांच्या संगणकावर दाखवण्यासाठी घेऊ शकता.

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना ही काय आहे

भारताला स्वातंत्र्य होण्याच्या 75 वर्षी पूर्ण होणाऱ्या आठवड्यांपासून, राज्यातील 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना मोफत बस प्रवास सेवा देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याकरीता ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डची आवश्यकता नाही आणि नागरिकांकडे आधार कार्ड, मतदानपत्रिका / बँक पासबुक असल्याची आवश्यकता आहे.

Leave a comment